माढ्याच्या जेलमधील पाच कैद्यांना कोरोनाची लागण; आरोग्य विभागाची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2020 14:10 IST2020-09-01T14:09:36+5:302020-09-01T14:10:00+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Corona infection in five inmates of Madha prison; Health department information | माढ्याच्या जेलमधील पाच कैद्यांना कोरोनाची लागण; आरोग्य विभागाची माहिती

माढ्याच्या जेलमधील पाच कैद्यांना कोरोनाची लागण; आरोग्य विभागाची माहिती

माढा : माढ्याच्या जेलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला असून आठ कैद्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली या पैकी पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याची घटना समोर आली आहे.


सदरील कैद्यांची तपासणी सोलापूर येथे करण्यात आली होती. यामुळे मंगळवार १ रोजी दुपारी माढ्यातील उर्वरित कैद्यांची व कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. सदानंद व्हनकळस यांनी दिली.

दरम्यान, या कैद्यांच्या संपर्कातील लोकांची माहिती घेण्याचे काम सुरू असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपर्कातील लोकांची व कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अमूल कादबाने यांनी दिली.

Web Title: Corona infection in five inmates of Madha prison; Health department information