पालकमंत्री, आमदारांमध्ये संघर्ष; शिंदेसेना, राष्ट्रवादी देणार टक्कर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 07:07 IST2025-12-28T07:06:30+5:302025-12-28T07:07:42+5:30
सोलापुरात महापालिकेच्या उमेदवारीवरून नाराजी : भाजपच्या बंडखाेरांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न; महाविकास आघाडी एकत्र लढणार

पालकमंत्री, आमदारांमध्ये संघर्ष; शिंदेसेना, राष्ट्रवादी देणार टक्कर
राकेश कदम -
साेलापूर : महापालिकेच्या उमेदवारीवरून पालकमंत्री जयकुमार गाेरे आणि भाजपच्या दाेन देशमुख आमदारांमध्ये संघर्ष पेटला आहे. एक आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. भाजपच्या बंडखाेरांना आपल्याकडे वळवून शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट जाेरदार टक्कर देण्याच्या तयारीत आहे. भाजपच्या विराेधात काॅंग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार), उद्धवसेना, माकप यांनी एकत्र येउन महाविकास आघाडी केली आहे.
मागील निवडणुकीत महापालिकेत भाजपची सत्ता हाेती. सत्तेच्या काळात पक्षाचे दाेन आमदार आणि नगरसेवकांमधील वाद चर्चेत राहिले. शहरात आता भाजपचे आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार देवेंद्र काेठे हे तीन आमदार आहेत.
आमदार काेठे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. महापालिका निवडणुकीच्या ताेंडावर पालकमंत्री जयकुमार गाेरे आणि आमदार काेठे यांच्या माध्यमातून देशमुख विराेधकांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. यावरून पालकमंत्री गाेरे, आ. काेठे आणि दाेन देशमुख असा वाद रंगला आहे. यामुळे बंडाळीची चिन्हे आहेत. या बंडखाेरांना आपल्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट करीत आहे.
काेणते मुद्दे निर्णायक?
शहरात पाच ते सहा दिवसाआड पाणीपुरवठा हाेताे. मागील निवडणुकीत एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचे आश्वासन दिले हाेते; मात्र ते फेल ठरले.
सत्तेच्या काळात भाजप नेत्यांमध्ये झालेले वाद, त्यात शहर विकासाकडे झालेले दुर्लक्ष
शहरातील वाहतुकीची काेंडी, अपूर्ण झालेले रस्ते आणि उड्डाणपुलाचे प्रकल्प
महापालिकेत हाेती भाजपची सत्ता
भाजप ४९
शिवसेना २१
काँग्रेस १४
एमआयएम ९
राष्ट्रवादी ४
बसपा ४
माकप १
मागील निवडणुकीत
एकूण मतदार
एकूण ६,७३,९४२
महिला ३,२५,६९७
पुरुष ३,४८,२२३
इतर २२
आता किती एकूण मतदार?
एकूण ९,२४,७०६
पुरुष ४,५७,९९
महिला ४,६७,४७१
इतर १२६
अंतिम मतदार यादी
प्रारूप मतदार यादीवर ५५५ हरकती आल्या हाेत्या. यापैकी ४६४ हरकती मान्य करण्यात आल्या. ९१ हरकती अमान्य करण्यात आल्या.
अंतिम मतदार यादी
प्रारूप मतदार यादीवर ५५५ हरकती आल्या हाेत्या. यापैकी ४६४ हरकती मान्य करण्यात आल्या. ९१ हरकती अमान्य करण्यात आल्या.