गणरायाचा रथ ओढत छत्रपती संभाजी महाराजांना प्रदक्षिणा घालून केली गणपती मुर्तीची प्रतिष्ठापना  

By Appasaheb.patil | Published: August 31, 2022 04:53 PM2022-08-31T16:53:15+5:302022-08-31T16:53:31+5:30

सोलापुरात गणेशोत्सवाचा माहोल; गणपती बप्पा मोरयाचा जयघोष...

Chhatrapati Sambhaji Maharaj was pulled by the chariot of Ganaraya and installed the idol of Ganapati. | गणरायाचा रथ ओढत छत्रपती संभाजी महाराजांना प्रदक्षिणा घालून केली गणपती मुर्तीची प्रतिष्ठापना  

गणरायाचा रथ ओढत छत्रपती संभाजी महाराजांना प्रदक्षिणा घालून केली गणपती मुर्तीची प्रतिष्ठापना  

Next

सोलापूरसोलापूर शहराचे प्रवेशव्दार म्हणजेच जुना पुना नाका.  चौत्रा पुणे नाका तरुण मंडळाची श्रींची प्रतिष्ठापना श्री गणेश भक्तांनी ढोल ताशांच्या निनादात श्रींचा रथ ओढत छत्रपती श्री संभाजी महाराज चौकास प्रदक्षिणा घालीत मंडळाच्या मंडपात श्रींची प्रतिष्ठापना मोठ्या भक्तिभावात संपन्न झाला.

सोलापूरचा नगरीचा संकटहारी पिवळ्या पीतांबरी रंगाच्या धोतीत चांदीच्या अलंकाराच्या आभूषणसह बप्पाची मूर्ती शोभून दिसत होती. यावेळी मंडळाचे आधारस्तंभ पुरुषोत्तम बरडे, उत्सव अध्यक्ष गणेश शिंदे, शहाजी खटके, आशुतोष बरडे, अखिल सय्यद,  महेश क्षीरसागर, राजेंद्र बोमरा, नंदकुमार खटके, सुरेश शेवतेकर , योगेश क्षीरसागर, सचिन सुरवसे,  राज पांढरे, पोपेश साळुंखे, संभाजी कोडगे आदींसह मंडळाचे जेष्ठ पदाधिकारी उत्सव पदाधिकारी मोठ्या संख्येने गणेश भक्तांची उपस्थिती होती. 

मंडळाच्यावतीने दरवर्षी गणेशोत्सवात सामाजिक उपक्रम राबविले जातात. शिवाय लेझीमचा सरावही गणेश उत्सव काळात दररोज नियमित रात्री केला जातो. मंडळाच्यावतीने शालेय साहित्य वाटप, गरीबांना धान्य वाटप, रक्तदान, अवयव दान, महिलांना साड्या वाटप असे विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. 

Web Title: Chhatrapati Sambhaji Maharaj was pulled by the chariot of Ganaraya and installed the idol of Ganapati.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.