Car accident at Ganpatipule; Policeman's wife killed on the spot, four injured | सांगोल्याजवळ कारचा अपघात; पोलिस कर्मचाऱ्याची पत्नी जागीच ठार, चौघे जखमी

सांगोल्याजवळ कारचा अपघात; पोलिस कर्मचाऱ्याची पत्नी जागीच ठार, चौघे जखमी

सोलापूर : कार आणि सवारी गाडी यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीचा मृत्यू झाला तर कारमधील तिघे व सवारी गाडीतील एक जण असे चौघे जण जखमी झाले आहेत. हा अपघात गुरुवारी मध्यरात्री एकच्या सुमारास महूद- दिघंची रोडवरील कटफळ (ता. सांगोला) येथील हॉटेल किनाऱ्याजवळ घडला. 


मृत पोलिस कर्मचारी कुटुंबासह गणपतीपुळे येथे गेले होते, तिथून परत येताना हा अपघात घडला. अपघातात मृत्यू व जखमींना ग्रामस्थांनी मदत करून उपचाराकरिता अकलूज, पंढरपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Web Title: Car accident at Ganpatipule; Policeman's wife killed on the spot, four injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.