मतदानापुर्वीच उमेदवाराचा झाला मृत्यू; जाणून घ्या कोणत्या गावात घडली घटना
By Appasaheb.patil | Updated: January 15, 2021 15:01 IST2021-01-15T14:37:52+5:302021-01-15T15:01:50+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकींग

मतदानापुर्वीच उमेदवाराचा झाला मृत्यू; जाणून घ्या कोणत्या गावात घडली घटना
सोलापूर : मतदानाला काही तास शिल्लक असतानाच उमेदवाराचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना खैराट (ता. अक्कलकोट) येथे घडली आहे. सायबण्णा बिराजदार असे मयत उमेदवाराचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, खैराट (ता. अक्कलकोट) ग्रामपंचायत निवडणूक मोठया चुरशीने होत होती. मयत सायबण्णा बिराजदार (वय ५८ ) यांनी गावातील एका वार्डातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मागील काही दिवसांपासून विजयी होण्यासाठी मयत सायबण्णा यांनी वॉर्डातील प्रत्येक घर ना घर पिंजून काढला. सकाळ, दुपार, संध्याकाळ प्रचारात ते मग्न होते. गुरूवारी त्यांना हदयविकाराचा त्रास होऊ लागल्याने त्यांना सोलापुरातील एका खासगी रूग्णालयात दाखल केले होते, मात्र मतदानादिवशी म्हणजे शुक्रवार १५ जानेवारी २०२१ रोजी पहाटे तीनच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
-------------
निवडणूक प्रक्रिया थांबविली...
ज्या वॉर्डातून मयत सायबण्णा बिराजदार यांनी उमेदवारी दाखल केली होती, त्या वॉर्डासाठी आज शुक्रवार १५ जानेवारी रोजी मतदान होणार होते. मतदान यंत्रे, मतदान अधिकारी, कर्मचारी, पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता, मात्र पहाटे तीन वाजता उमेदवार सायबण्णा बिराजदार यांचा मृत्यू झाल्याने त्या वॉर्डासाठीची निवडणूक प्रक्रिया थांबविण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.