Breaking; अक्कलकोट तालुक्यात गोळीबार; भर चौकात घडली घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2021 17:14 IST2021-11-06T17:12:25+5:302021-11-06T17:14:31+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Breaking; अक्कलकोट तालुक्यात गोळीबार; भर चौकात घडली घटना
अक्कलकोट: केगाव बु येथील गुल्या नावाच्या व्यक्तीला मंगरूळ (ता.अक्कलकोट) येथे भर चौकात एस टी स्टँड, ग्रामपंचायत ऑफिससमोर एका अज्ञात व्यक्तीने गोळीबार करून गंभीर जखमी केला आहे.
दरम्यान, ही घटना शनिवार दि.६ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता घडली आहे. जखमीला सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेत जखमीच्या डाव्या बाजूच्या पोटात गोळी घुसली आहे.