Bogotas polling in Solapur; Polling done by voters made by voters | सोलापुरात बोगस मतदान; खºया मतदारांने केले चॅलेंजिंग मतदान
सोलापुरात बोगस मतदान; खºया मतदारांने केले चॅलेंजिंग मतदान

ठळक मुद्दे- सोलापूर शहरातील आंबेडकर हायस्कुलमधील प्रकार- निवडणुक अधिकाºयावर ठेवला हलगर्जीपणाचा ठपका- पुढील तपास करण्याचे अधिकाºयांनी दिले आश्वासन

सोलापूर : शहरातील डफरीन चौकातील डॉ. आंबेडकर हायस्कूल मध्ये बूथ क्रमांक १७६ वर करण्यात आलेलं मतदान बोगस असल्याची तक्रार चांगदेव बाबू नाईकनवरे या मतदारांने केली.  यानंतर निवडणूक अधिकाºयांवर हलगर्जीपणाचा ठपका ठेवत चॅलेंजिंग मतदान केले.

चांगदेव नाईक नवरे हे साडेअकरा वाजता मतदान केंद्रावर आले. त्यांनी आपले मतदान कार्ड निवडणूक अधिकाºयांना दाखवले़ निवडणूक अधिकारी यांनी तुमच्या नावाचं मतदान झाला आहे असं सांगितलं. यानंतर नाईकनवरे यांनी मी मतदान केलं नाही माझं मतदान कार्ड बघा, हाताला शाही आहे का बघा असं निवडणूक अधिकाºयाला सांगितलं.

यावेळी अधिकाºयांनी  बोगस मतदान झाल्याच्या तक्रारीची दखल घेत चांगदेव नाईकनवरे यांना चॅलेंजिंग मतदान करण्याची परवानगी दिली. पूर्वी चांगदेव नाईकनवरे यांच्या नावावर मतदान केलेल्या मतदाराचा आधार क्रमांक निवडणूक आयोगाने घेऊन ठेवला होता. या प्रकाराचा तपास घेतला जाईल असे आश्वासन यावेळी अधिकाºयांनी दिले.

 


Web Title: Bogotas polling in Solapur; Polling done by voters made by voters
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.