भाजपचा कमी जागांचा प्रस्ताव, शिंदेसेनेची ३० जागांची मागणी; पदाधिकाऱ्यांची बैठक, आज युतीबाबत पुन्हा चर्चेची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 10:35 IST2025-12-27T10:33:35+5:302025-12-27T10:35:35+5:30
युतीबाबत भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, अमर पाटील, शहराध्यक्ष सचिन चव्हाण आदींची शुक्रवारी बैठक झाली.

भाजपचा कमी जागांचा प्रस्ताव, शिंदेसेनेची ३० जागांची मागणी; पदाधिकाऱ्यांची बैठक, आज युतीबाबत पुन्हा चर्चेची शक्यता
सोलापूर : नगरपरिषदेत मिळालेल्या यशामुळे शिंदेसेनेचा आत्मविश्वास वाढला आहे. यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिंदेसेनेकडून ४२ जागांची मागणी केली होती. भाजपने केवळ सात ते दहा जागा देण्याची तयारी दर्शविल्यानंतर दोन्हा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीनंतर शिंदे सेनेने ३० जागांचा प्रस्ताव पाठविला आहे.
युतीबाबत भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, अमर पाटील, शहराध्यक्ष सचिन चव्हाण आदींची शुक्रवारी बैठक झाली.
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
यात चर्चेनंतर फॉर्म तयार ठेवा...
सध्या शिंदेसेनेत इच्छुकांची संख्याही जास्त आहे. यामुळे युतीबाबत घोषणा जरी झाली नसली तरी इच्छुकांनी आपले सर्व कागदपत्रे, एनओसी, फॉर्म भरून तयार ठेवावे. हे फॉर्म तपासण्यासाठी वकिलांची टीम आहे. इच्छुकांची फॉर्म भरून तयार ठेवल्याची माहिती कार्यकर्त्यांनी दिली.
शिंदेसेनेने ३० जागांचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावावर भाजपकडून चर्चा करू असे सांगण्यात आले. यामुळे आज, शनिवारी याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
सध्या युतीबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे. संपर्क प्रमुख संजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही ३० जागांचा प्रस्ताव पाठवला आहे. यावर चर्चा करून शनिवारी निर्णय होईल.
- अमोल शिंदे, जिल्हाप्रमुख, शिंदेसेना.
शुक्रवारी सायंकाळी ज्ञानेश्वर सपाटे यांनी शिंदेसेनेत जाहीर प्रवेश केला. यामुळे प्रभाग ७ मध्ये पक्षाची ताकद वाढल्याचे कार्यकर्त्यांचे मत आहे.