मोठी बातमी; श्रीकांत देशमुखांच्या विरोधात पीडितेची महिला आयोगाकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2022 17:09 IST2022-07-17T17:09:08+5:302022-07-17T17:09:14+5:30

सोलापूर : भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या विरोधात ‘त्या’ महिलेने राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. घराबाहेर ...

big news; Victim's complaint against Srikant Deshmukh to Women's Commission | मोठी बातमी; श्रीकांत देशमुखांच्या विरोधात पीडितेची महिला आयोगाकडे तक्रार

मोठी बातमी; श्रीकांत देशमुखांच्या विरोधात पीडितेची महिला आयोगाकडे तक्रार

सोलापूर : भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या विरोधात ‘त्या’ महिलेने राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. घराबाहेर पडायला भीती वाटत आहे, असे म्हणत महिलेने मेलद्वारे आयोगाकडे तक्रार केली आहे.

माझ्या सहीनिशीची तक्रार दखलपात्र गुन्हा म्हणून नोंद करण्याबाबत संबंधित पोलिसांना योग्य ते निर्देश द्यावेत; अथवा माझी तक्रार नोंदविण्यासाठी मला मदत करावी, असे म्हटले आहे. समोरची व्यक्ती आर्थिक व राजकीयदृष्ट्या बलाढ्य असल्यामुळे मला भीतीपोटी बाहेर जाऊन फिर्याद देणे शक्य न झाल्याने ही फिर्याद ईमेलद्वारे दाखल करत आहे, असेही म्हटले आहे.

चार दिवसांपूर्वी श्रीकांत देशमुख यांचा एका महिलेसोबत बेडरूममधील व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला होता. या व्हिडिओत संबंधित महिला आणि देशमुख दिसत आहेत. महिलेने मोबाईलच्या कॅमेऱ्यासमोर येऊन देशमुखांचे नाव घेत, त्याने आपल्याला फसविल्याचे सांगत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

 

 

Web Title: big news; Victim's complaint against Srikant Deshmukh to Women's Commission