मोठी बातमी; भरधाव निघालेली कार टिपरवर आदळली; चौघे जण गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2021 16:14 IST2021-11-16T16:14:32+5:302021-11-16T16:14:57+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग

मोठी बातमी; भरधाव निघालेली कार टिपरवर आदळली; चौघे जण गंभीर जखमी
सोलापूर : भरधाव वेगात निघालेल्या कारचे अचानक चाक निघाल्याने धावत्या ट्रकवर आदळली. या धडकेत चौघे जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. हा अपघात दिघेवाउी (ता. सांगोला) येथील रत्नागिरी ते नागपूर महामार्गावर घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दिघे वाडी (ता. सांगोला) येथे रत्नागिरी ते नागपूर या मार्गावरील भरधाव वेगाने जाणाऱ्या कारचे चाक निघुन गेल्याने पुढे चाललेल्या टिपरला जोराची धडक दिली. प्राथमिक माहितीनुसार यामध्ये चौघे जण गंभीर जखमी झाले असून हे सर्वजण सीआरपीएफचे जवान असल्याचे या ठिकाणी सांगण्यात आले. हे चौघे छत्तीसगडहून गावी जात असताना ही घटना या ठिकाणी घडली आहे. यातील एकजण गंभीर जखमी असल्याचेही सांगण्यात आले.