मोठी बातमी; जिंतीच्या राजेभोसले यांच्या वाड्यात लक्ष्मीपुजनाच्या मुहूर्तावर धाडसी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2020 21:58 IST2020-11-15T21:58:19+5:302020-11-15T21:58:24+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Big news; Daring theft at the moment of Lakshmi Puja in the palace of Jinti's Rajebhosle | मोठी बातमी; जिंतीच्या राजेभोसले यांच्या वाड्यात लक्ष्मीपुजनाच्या मुहूर्तावर धाडसी चोरी

मोठी बातमी; जिंतीच्या राजेभोसले यांच्या वाड्यात लक्ष्मीपुजनाच्या मुहूर्तावर धाडसी चोरी

करमाळा : जिंती (ता.करमाळा) येथील राजेभोसले यांच्या वाड्यात लक्ष्मीपुजनाच्या मुहुर्तावर देवघरात पुजेसाठी ठेवलेले सोन्या चांदीच्या दागिण्यासह इतिहासकालिन नानी व रोकडसह तीन लाखाची जबरी चोरी झाली आहे.  राजेंच्या वाड्यात चोरी झाल्याने  भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जिंती गावात आज शनिवारी पहाटे सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास चोरांनी राजेभोसले यांच्या वाड्यामध्ये जबरी चोरी केली. लक्ष्मीपुना निमित्त राजेभोसले यांनी देवघरात दागिणे व पैशाचे पुजन केले होते. हे पूजन केलेले पैसे व दागिणे चोरांनी पळवले आहेत. वाड्यामध्ये सी.सी.सी टीव्ही असल्यामुळे चोरट्यांचे सीसीटिव्ही फुटेज सापडले आहे.

सीसीटीव्ही फुटेज मध्ये सहा चोर दिसत आहेत. त्यांनी तोंडांना रुमाल बांधलेले होते. या चोरांनी सोन्याचा एक नेकलेस,जुनी इतिहासकालिन नानी, चांदीचे दागिणे व रोख एक लाख पंचवीस हजार रुपये असे एकुण दोन लाख पंच्यान्नव हजार रुपयांची चोरी केली आहे.

 आज सकाळपासून पोलीस श्वान पथकाच्या सहाय्याने तपास करीत असून करमाळा पोलिसात अज्ञात इसमाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी  शहाजीराजे उमाजीराजे भोसले यांनी करमाळा पोलिसात फिर्याद दिली आहे.या चोरीच्या तपासासाठी सोलापूर येथुन श्वानपथक मागवण्यात आले होते. श्वानाने चोरांचा माग काढलेला आहे. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

Web Title: Big news; Daring theft at the moment of Lakshmi Puja in the palace of Jinti's Rajebhosle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.