मोठी बातमी; अहमदनगर-टेंभुर्णी महामाार्ग अपघात; दोघे जण जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 20:07 IST2021-05-30T20:05:58+5:302021-05-30T20:07:17+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग

मोठी बातमी; अहमदनगर-टेंभुर्णी महामाार्ग अपघात; दोघे जण जागीच ठार
करमाळा : अहमदनगर - टेंभुर्णी महामार्गावर अकलूजहून आष्टीकडे जात असताना मांगी येथे झालेल्या अपघातात लक्ष्मण लोखंडे ( जामखेड) व महेश शिंदे (अकलूज) दोघेही ठार झाले आहे. तर अनोळखी वाहन चालक धडक देऊन पसार झाला आहे.
सदर चा अपघात रविवारी सकाळी झाला आहे. परिसरातील लोकांनी करमाळा पोलीस ठाण्यात कळवल्यानंतर करमाळा पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, पोलीस उपनिरीक्षक तानाजी पवार, ए एस आय वने यांनी घटनास्थळाला भेट दिली. घटनास्थळाचा पंचनामा करून दोघांना उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. त्या ठिकाणी त्यांचा पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.