भरधाव वेगातील दुचाकी ट्रॅव्हल्सला धडकली; एक ठार, एक जण जखमी, सांगोल्याजवळील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2021 21:58 IST2021-12-27T21:58:33+5:302021-12-27T21:58:38+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग

भरधाव वेगातील दुचाकी ट्रॅव्हल्सला धडकली; एक ठार, एक जण जखमी, सांगोल्याजवळील घटना
सांगोला : दुचाकीला ओव्हरटेक करण्याच्या नादात दुसरी दुचाकी समोरून येणाऱ्या भरधाव ट्रॅव्हल्सला धडकून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला तर दुचाकीवरील एक जण गंभीर जखमी झाला.
हा अपघात सोमवारी रात्री ७:३० च्या सुमारास सांगोला - वाढेगाव रोडवरील बंधन पॅलेसजवळ घडला. धनाजी शिवाजी माने (२८ रा. वाकी घेरडी ता. सांगोला) असे मृत दुचाकीस्वारांची नाव आहे तर दीपक राऊत (रा. मेडशिंगी ता. सांगोला) असे जखमी दुचाकीस्वार यांचे नाव आहे. जख्मीची प्रकृती गंभीर असल्याने उपचाराकरिता पंढरपूर येथे हलवले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन वाघ, पोलीस नाईक अमर पाटील, पोलीस कॉन्स्टेबल धुळा चोरमले यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीना उपचाराकरिता सांगोला ग्रामीण रुग्णालयाकडे पाठवून देवून रस्त्यावरील अपघातग्रस्त दुचाकी बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली. उशिरापर्यंत या अपघाताची सांगोला पोलीस स्टेशनला नोंद झाली नव्हती.