भोसले राजघराण्याच्या 273 वर्ष जुन्या राजवाड्याचा बुरुज ढासळला; अक्कलकोट येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 11:47 IST2020-10-14T11:46:35+5:302020-10-14T11:47:48+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग

भोसले राजघराण्याच्या 273 वर्ष जुन्या राजवाड्याचा बुरुज ढासळला; अक्कलकोट येथील घटना
सोलापूर : सोलापूर शहरासह जिल्ह्याभरात पावसाचा हाहाकार उडाला आहे. या पावसाचा फटका भोसले राजघराण्यातील अक्कलकोट संस्थानच्या जुन्या राजवाड्याला बसला आहे. 273 वर्ष जुन्या राजवाड्याचा बुरुज ढासळला आहे.
सोलापूरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून परतीच्या पावसाचा जोर वाढला आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. परतीच्या पावसाच्या तडाख्यामुळे 273 वर्ष जुना असलेल्या भोसले राजघराण्यातील अक्कलकोट संस्थानच्या राजवाड्याला फटका बसला आहे. अक्कलकोट संस्थानचा दुर्बीण बुरूज ढासळला आहे. अतिवृष्टी आणि झाडा झुडपांमुळे दुर्बीण बुरुज कोसळला आहे.