प्रचारासाठी पंढरपुरात आलेले अजितदादा व्यापाऱ्यांचा रुसवा काढण्यात अडकले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 12:21 IST2021-04-08T12:21:26+5:302021-04-08T12:21:31+5:30

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरातील नाराज व्यापाऱ्यांसोबत बैठक सुरू

Ajitdada, who came to Pandharpur for campaigning, got stuck in removing the veil of traders! | प्रचारासाठी पंढरपुरात आलेले अजितदादा व्यापाऱ्यांचा रुसवा काढण्यात अडकले !

प्रचारासाठी पंढरपुरात आलेले अजितदादा व्यापाऱ्यांचा रुसवा काढण्यात अडकले !

पंढरपूर - उपमुख्यमंत्री अजित पवार पोटनिवडणूक प्रचारासाठी पंढरपूरमध्ये आले आहेत. राज्यात वाढत आसलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव यामुळे  निर्बंध कडक करीत काही सेवा वगळता लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे सर्वसामान्य व्यापारी नागरिक नाराज आहेत. अजित पवार येताच त्यांनी व्यापाऱ्यांसोबत बैठक घेत रुसवा काढण्यात वेळ घालवला.

कल्याणराव काळे यांच्या घरी झालेल्या बैठकीत त्यांनी व्यापाऱ्यांच्या तक्रारी एकूण घेतल्या व राज्यात कोरोनाची परिस्थिती किती गंभीर आहे याबाबत व्यापाऱ्यांना सूचित केले. मात्र राज्य सरकार व्यापाऱ्यांसोबत असून येत्या दोन दिवसात सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे आश्वासन अजित पवार यांनी व्यापाऱ्यांना दिले. 

Web Title: Ajitdada, who came to Pandharpur for campaigning, got stuck in removing the veil of traders!