दरोडा, विनयभंग, घरफोडी अन् जबरी चोरीतील संशयित आरोपी जेरबंद; करमाळा पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2021 12:55 IST2021-12-25T12:53:18+5:302021-12-25T12:55:29+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Accused of robbery, molestation, burglary and burglary arrested; Karmala police action | दरोडा, विनयभंग, घरफोडी अन् जबरी चोरीतील संशयित आरोपी जेरबंद; करमाळा पोलिसांची कारवाई

दरोडा, विनयभंग, घरफोडी अन् जबरी चोरीतील संशयित आरोपी जेरबंद; करमाळा पोलिसांची कारवाई

करमाळा : विनयभंग, दरोडा, घरफोडी व जबरी चोरी असे वेगवेगळे गुन्हे दाखल असलेला संशयित आरोपी पकडण्यात करमाळा पोलिसांना यश आले आहे.बंडू ऊर्फ बंड्या होनाजी उर्फ होन्या पवार असे पकडलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. तो ४० वर्षाचा असून आवाटी येथील राहणार आहे.


संशयित आरोपी बंडू ऊर्फ बंड्या होनाजी उर्फ होन्या पवार याच्यावर करमाळा, कुर्डुवाडी व दौड रेल्वे पोलिसात गुन्हे दाखल आहेत. संशयित आरोपी हा चोऱ्या करून फरार होताहोता. त्याच्यावर करमाळा पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. ३९५, ३५४ व ३२४ या कलमांतर्गत हे गुन्हे दाखल झालेले आहेत.
कुर्डुवाडी पोलिसात एक गुन्हा दाखल असून ३९४ व ३९७ या कलमांतर्गत हा गुन्हा दाखल झालेले आहे. तर दौड रेल्वे पोलिसात ३७९ या कलमांतर्गत त्याच्याविरुद्ध तीन गुन्हे दाखल आहेत.


संशयित आरोपीवर २००४ पासून २०१९ दरम्यान सहा गुन्हे दाखल झालेले आहेत. तेव्हापासून तो फरार होता. पोलिस त्याच्या मागावर होते. मात्र तो सापडत नव्हता. अखेर पोलिसांना त्याला पकडण्यात यश आले आहे. करमाळ्याचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना पवारबद्दल माहिती मिळाली त्यानंतर पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते व उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल हिरे,अप्पर पोलिस अधिक्षक हिंमत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला अटक करण्यात आली आहे. यासाठी तौफिक काझी, महिला पोलिस शितल पवार, गणेश खोटे आदींनी कामगिरी केली.

Web Title: Accused of robbery, molestation, burglary and burglary arrested; Karmala police action