देवदर्शन करून परतताना अक्कलकोटजवळ अपघात; एक ठार, २१ जण गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2021 11:21 IST2021-12-01T11:19:47+5:302021-12-01T11:21:45+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Accident on Akkalkot Road while returning from Devdarshan; One killed, 21 seriously injured | देवदर्शन करून परतताना अक्कलकोटजवळ अपघात; एक ठार, २१ जण गंभीर जखमी

देवदर्शन करून परतताना अक्कलकोटजवळ अपघात; एक ठार, २१ जण गंभीर जखमी

सोलापूर - कर्नाटकातून देवदर्शन करून परतताना टेम्पो पलटी होऊन झालेल्या अपघातात एक ठार जागीच ठार झाला असून टेम्पोतील २१ भाविक जखमी झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्री सोलापूर-अक्कलकोट रोडवरील कोन्हाळी गावाजवळ घडली.

यानंतर लगेच या रस्त्यावरून चाललेल्या इतर वाहनधारकांनी तात्काळ मदतीचा हात दिला. तसेच जखमींना उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल करण्यास मदत केली. त्यानंतर घटनेची माहिती मिळताच पोलिस यंत्रणाही घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. अपघातातील वाहने रस्त्याच्या कडेला करून वाहतूक सुरळीत केली. 

Web Title: Accident on Akkalkot Road while returning from Devdarshan; One killed, 21 seriously injured