दीपकभाई आता राणेंचा दहशतवाद संपला का? सावंतवाडीत बॅनरबाजी; शिंदेसेनेचे पदाधिकारी आक्रमक
By अनंत खं.जाधव | Updated: November 6, 2024 19:42 IST2024-11-06T19:39:52+5:302024-11-06T19:42:15+5:30
सावंतवाडी : मंत्री दीपक केसरकरांच्या विरोधात अज्ञाताकडून लावण्यात आलेल्या बॅनरवरून चांगलेच राजकारण तापले. ऐन निवडणुकीच्या काळात केसरकर यांना उद्देशून ...

दीपकभाई आता राणेंचा दहशतवाद संपला का? सावंतवाडीत बॅनरबाजी; शिंदेसेनेचे पदाधिकारी आक्रमक
सावंतवाडी : मंत्री दीपक केसरकरांच्या विरोधात अज्ञाताकडून लावण्यात आलेल्या बॅनरवरून चांगलेच राजकारण तापले. ऐन निवडणुकीच्या काळात केसरकर यांना उद्देशून लावण्यात आलेल्या बॅनरवरून शिंदेसेना आक्रमक झाली आहे. दीपकभाई आता राणेंचा दहशतवाद संपला का? अशा संदेशाचे हे बॅनर लावण्यात आले होते. प्रशासनाकडून तो बॅनर आता हटविण्यात आला आहे.
यावरूनच शिंदेसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. ‘तो’ बॅनर कोणी लावला हे आम्हाला माहित आहे. पोलिसांकडून यावर कारवाई करण्यात यावी. हे बॅनर रात्रीच्या वेळी दरोडेखोर सारखे लावण्यात आला आहे. चोरी छुपे बॅनर लावायची सवय कुणाला आहे ते सर्वांना माहिती आहे. त्यामुळे यापुढे मतदारसंघात एकजरी बॅनर दिसला तरी गप्प बसणार नाही असा इशारा शिंदेसेनेचे जिल्हा संघटक संजू परब यांनी दिला.
परब म्हणाले, बॅनर ज्यानी लावले त्याना मी अनेक वर्षे ओळखतो. समोर येऊन लढण्याची हिंमत त्यांच्यामध्ये नाही. त्यामुळे ते अंधारात अशी बालीशकृत्ये करत आहेत. हिंमत असेल तर त्यांनी जाहीरपणे आरोप करावेत त्याला उत्तर द्यायला आम्ही समर्थ आहोत. यापुढे एकजरी बॅनर लावला तरी पळताभुई थोडी करू, असा इशाराही संजू परब यांनी दिला.