नगराध्यक्ष पदाचा उमेदवारच म्हणतोय, “मला मतदान करू नका!”, नेमकं कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 14:07 IST2025-11-27T14:05:28+5:302025-11-27T14:07:04+5:30
कराड मध्ये चक्क स्वत: उमेदवार सांगतोय मला मतदान करू नका. उमेदवारी देताना खुल्या वर्गावर राजकीय पक्षांनी केलेला अन्याय व निवडणुकीच्या माध्यमातून अपप्रवृत्तीचा होत असलेला शिरकावा यातूनच अपक्ष उमेदवार ॲड. श्रीकांत घोडके यांनी पोटतिडकीने निर्णय घेतला आहे.

नगराध्यक्ष पदाचा उमेदवारच म्हणतोय, “मला मतदान करू नका!”, नेमकं कारण काय?
सातारा- राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. कराड नगरपालिकेची निवडणूक सुरू आहे. प्रचार सभा जोरदार सुरू आहेत, कराड येथील एका उमेदवाराचा सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक उमेदवार लोकांना मला मतदान करु नका असे सांगत असल्याचे दिसत आहे.
५० खोके हे सत्यच, संतोष बांगरांना एकनाथ शिंदेंनी ५० कोटी दिले; भाजपा आमदाराचा खळबळनजक दावा
कराड मध्ये चक्क स्वत: उमेदवार सांगतोय मला मतदान करू नका. उमेदवारी देताना खुल्या वर्गावर राजकीय पक्षांनी केलेला अन्याय व निवडणुकीच्या माध्यमातून अपप्रवृत्तीचा होत असलेला शिरकावा यातूनच अपक्ष उमेदवार ॲड. श्रीकांत घोडके यांनी पोटतिडकीने निर्णय घेतला आहे. मला मतदान करू नका असे ते प्रचार करत मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत.
दरम्यान, त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी या प्रचाराचे कारणही सांगितले आहे. "कराड नगरपालिकेत २५ वर्षानंतर नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसाधारण वर्गासाठी खुले असताना याठिकाणी भाजप व काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षाने नगराध्यक्ष पदासाठी ओबीसी उमेदवार देऊन आम्हा मराठ्यांवर अन्याय केलेला आहे. तसेच निवडणूक प्रक्रियेवर नाराजी व निवडणुकीच्या माध्यमातून अपप्रवृत्तीचा होत असलेला शिरकावा सहन होत नसल्याने हा निर्णय घेतला असल्याचे नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार ॲड. श्रीकांत घोडके यांनी सांगितले.
तब्बल २५ वर्षांनंतर खुल्या प्रवर्गासाठी नगराध्यक्षपद
कराड पालिका निवडणुकीसाठी १५ प्रभागांतून ३१ नगरसेवक तर थेट जनतेतून १ नगराध्यक्ष निवडला जाणार आहे. तर तब्बल २५ वर्षांनंतर खुल्या प्रवर्गासाठी नगराध्यक्षपद आरक्षित झाल्याने निवडणुकीत इच्छुकांची भाऊगर्दी निर्माण झाली आहे.
पालिकेच्या निवडणुकीत भाजप व काँग्रेस स्वबळावर रिंगणात उतरले आहेत तर दोन्ही राष्ट्रवादी व शिंदेसेना यांनी आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाणे पसंत केले आहे. या सगळ्यांकडेच इच्छुकांची मोठी संख्या होती. पण पक्षाची व आघाडीची उमेदवारी देताना सर्वांचेच समाधान होऊ शकलेले नाही. त्यामुळे अनेक अर्ज अपक्ष म्हणून शिल्लक राहिले आहेत. पण यातील अनेकजण बंडाची भाषा बोलू लागल्याने त्यांना थंड करण्याचे आव्हान नेत्यांसमोर आहे.