Satara: फलटण पुन्हा एकदा गूढ आवाजाने हादरले, नागरिकांमध्ये संभ्रमावस्था 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 13:24 IST2025-07-02T13:23:38+5:302025-07-02T13:24:34+5:30

प्रशासनाकडून याबाबत कुठल्याही प्रकारची माहिती दिली गेली नाही

Phaltan once again shaken by mysterious noise confusion among citizens | Satara: फलटण पुन्हा एकदा गूढ आवाजाने हादरले, नागरिकांमध्ये संभ्रमावस्था 

Satara: फलटण पुन्हा एकदा गूढ आवाजाने हादरले, नागरिकांमध्ये संभ्रमावस्था 

फलटण (जि. सातारा) : फलटण तालुक्यात गूढ आवाजाची मालिका कायम असून मंगळवारी (दि. १) सकाळी नऊ वाजता मोठा गूढ आवाज आल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. ब्लास्टिंगसारख्या आवाजाप्रमाणेच हा गूढ आवाज असल्याचे सांगण्यात येत होते. या आवाजाबद्दल नागरिकांमध्ये संभ्रमावस्था कायम आहे. तालुका प्रशासनाकडून याबाबत कुठल्याही प्रकारची माहिती दिली गेली नाही.

फलटण शहरालगतच्या भागात मोठा गूढ आवाज झाला. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ब्लास्टिंगसारखा मोठा आवाज झाल्याने भूकंप झाल्याची चर्चा सुरू झाली होती. फलटण शहरासह तालुक्यात मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास गूढ आवाज झाला.

तालुका प्रशासनाकडे याबाबत विचारणा केली असता याबाबत अधिक माहिती घेऊन सांगतो, असे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी सांगितले.

Web Title: Phaltan once again shaken by mysterious noise confusion among citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.