गोरे म्हणतात...भाजपचे रणजितसिंह माझ्या घरातला माणूस -चर्चा तर होणारच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 13:15 IST2019-04-05T13:14:06+5:302019-04-05T13:15:22+5:30
माढा मतदार संघातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर हा माझ्या घरातला माणूस असल्याचे सुतोवाच करून पुन्हा माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी

गोरे म्हणतात...भाजपचे रणजितसिंह माझ्या घरातला माणूस -चर्चा तर होणारच
म्हसवड : माढा मतदार संघातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर हा माझ्या घरातला माणूस असल्याचे सुतोवाच करून पुन्हा माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी माढ्याच्या राजकारणात नवीन ट्विस्ट आणला आहे. म्हसवड येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
म्हसवड येथे आयोजित बैठकीस काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी उपनगराध्यक्ष दत्तोपंत भागवत, माजी नगराध्यक्ष नितीनभाई दोशी, विजय धट, सुरेश म्हेत्रे, डॉ. वसंत मासाळ, वैशाली लोखंडे, शोभा लोखंडे, ईश्वरा खोत, माजी नगरसेवक बी. एम. अबदागिरे, सूरज ढोले आदी उपस्थित होते. आमदार गोरे म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकीत माढा मतदार संघातील कोणत्या उमेदवाराला मदत करायची? हा सध्या यक्षप्रश्न आपल्या सर्वांसमोर आहे, कारण इकडे आड आणि तिकडे विहीर आहे, त्यामुळे कशात तरी उडी मारावीच लागणार आहे; पण पाणी कशात आहे, हे बघूनच उडी मारली पाहिजे.
आघाडीधर्म केवळ काँगे्रसनेच पाळायचा?
माण तालुक्यातील काँग्रेसला जिथे जिथे अडवता येईल, तिथं तिथं राष्ट्रवादीने अडवण्याचा प्रयत्न केला असून, लोकसभेला याच राष्ट्रवादीला मदत करून आघाडीचा धर्म फक्त आपणच पाळायचा का? असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.