साताऱ्यात तणाव; संजीवराजेंच्या घरी IT ची धाड; समर्थकांची बंगल्याबाहेर गर्दी
By दीपक शिंदे | Updated: February 5, 2025 16:07 IST2025-02-05T16:05:31+5:302025-02-05T16:07:30+5:30
फलटण : राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू आणि सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष ...

साताऱ्यात तणाव; संजीवराजेंच्या घरी IT ची धाड; समर्थकांची बंगल्याबाहेर गर्दी
फलटण : राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू आणि सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरी आयकर विभागाने बुधवारी सकाळी ६ वाजता छापा टाकला आहे. संजीवराजे नाईक निंबाळकर हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी करण्यापूर्वीच आयकर विभागानं छापा टाकला आहे. सकाळीच आयकर विभागाचं पथक संजीवराजे यांच्या घरी दाखल झालं. त्यांच्या घराचे मुख्य गेट बंद करून कारवाईस सुरुवात झाली.
संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमाणेच रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडी पडल्या आहेत. हे दोघेही रामराजे यांचे चुलत बंधू आहेत. सकाळी सहा वाजता केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी छापा टाकण्यासाठी दाखल झालं आहेत. याविषयीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
छाप्याबाबत माहिती मिळताच राजे गटाचे कार्यकर्त्यांकडे दाखल झाले. यामुळे शहरात तणावाचे वातावरण तयार झाले असून संजीवराजे यांच्या निवास्थानाबाहेर कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली आहे. मात्र कारवाई सुरूच असून आत नक्की काय चालले आहे हे त्यांना कळू शकलेली नाही. त्यामुळे तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. शहरातील त्यांच्या निवासस्थाना बरोबरच मलटन येथील एका पेट्रोल पंपावर तसेच तरडगाव येथील खासगी कंपन्यांवर धाडी पडल्याचे सांगितले जात आहे.