केळवली धबधब्यात युवक बुडाला
By दीपक शिंदे | Updated: June 30, 2024 20:50 IST2024-06-30T20:50:26+5:302024-06-30T20:50:40+5:30
शोध मोहिमेत पाण्याचा प्रवाह ठरतोय अडथळा

केळवली धबधब्यात युवक बुडाला
सातारा: परळी खोऱ्यातील केळवळी (ता. सातारा) येथील धबधब्यात रविवारी सैदापुर (ता. कऱ्हाड ) येथील ऋषिकेश रमेश कांबळे हा पोहताना पाण्याच्या प्रवाहात बुडाला असल्याचे मित्रांकडून सांगण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ तसेच पोलिसांकडून शोधमोहिम राबवण्यात आली. मात्र, धबधब्यातील पाण्याचा प्रवाह अडथळा ठरत आहे.
सैदापूर येथील ऋषिकेश कांबळे (वय-२२) हा त्याच्या दोन मित्रांसोबत रविवारी केळवली धबधबा बघण्यासाठी आले होते. यावेळी ऋषिकेश पाण्यात उतरला पोहताना धबधब्याच्या पाण्याच्या मुख्य प्रवाहात आल्याने तो बुडाला असल्याचे त्याच्या मित्रांकडून सांगण्यात आले. ही घटना ग्रामस्थांना समजताच तत्काळ पोलीस यंत्रणेशी संपर्क केला. यानंतर दुपारी १२ वाजल्यापासून ऋषिकेची शोधाशोध सुरु केली मात्र, पाण्याचा प्रवाह मोठा आणि पावसाची रिपरिप यामुळे मोठी अडचण येत होती. सायंकाळपर्यंत शोधमोहिम सुरु होती. सदर घटनेची तालुका पोलीस स्टेसनला गुन्हा नोंद झाली आहे.