Sangli: मिरजेत डॉक्टर पत्नीसह दोन महिलांना कोरोना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 16:04 IST2025-06-04T16:04:01+5:302025-06-04T16:04:25+5:30

दोघींना घरात विलगीकरण करण्यात आले

Two women including doctor wife test positive for coronavirus in Miraj | Sangli: मिरजेत डॉक्टर पत्नीसह दोन महिलांना कोरोना

Sangli: मिरजेत डॉक्टर पत्नीसह दोन महिलांना कोरोना

मिरज : मिरजेत बोलवाड रस्ता परिसर व शहरात पाण्याची टाकी परिसरातील डॉक्टर पत्नीसह दोन महिलांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. दोघींना घरात विलगीकरण करण्यात आले आहे. 

दोन्ही महिला बाहेरगावी जाऊन आल्यानंतर त्यांना ताप, खोकला, कफ अशी लक्षणे जाणवू लागली. त्यांच्या नमुन्यांची तपासणी केली असता त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. 

यामुळे आरोग्य प्रशासनातर्फे दोघींच्या संपर्कात आलेल्यांचे व त्यांच्या घरातील व्यक्तींच्या तपासण्या करण्यात येत असल्याचे महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. वैभव पाटील यांनी सांगितले.

Web Title: Two women including doctor wife test positive for coronavirus in Miraj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.