Sangli: उरूण ईश्वरपूर नामांतरासाठी सह्यांचे निवेदन, साखळी उपोषणाला आमदार सत्यजित देशमुख यांचा पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 19:23 IST2025-08-08T19:22:30+5:302025-08-08T19:23:05+5:30
सह्यांच्या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, खासदार, सर्व आमदारांना देण्यात येणार

Sangli: उरूण ईश्वरपूर नामांतरासाठी सह्यांचे निवेदन, साखळी उपोषणाला आमदार सत्यजित देशमुख यांचा पाठिंबा
इस्लामपूर : इस्लामपूर शहराचे नामकरण करताना उरूण शहराच्या नावाचा उल्लेख करावा यासाठी ५० हजार सह्यांचे निवेदन राज्यपाल यांना देण्यात येणार आहे. त्यांचा शुभारंभ आ. सत्यजित देशमुख यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी शहाजी पाटील, बाळासाहेब पाटील, खंडेराव जाधव, शैलेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
१८ जुलै २०२५ रोजी विधानसभा आणि विधानपरिषद मधील कायदे मंडळाने इस्लामपूर शहराचे नाव ईश्वरपूर असे बदलण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली आहे. या प्रस्तावात जोड शहर असलेल्या उरूण नावाचा उल्लेख नाही. त्यामुळे उरूण परिसरातील नागरिकांनी साखळी उपोषण सुरू केले. याला सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. तरीही याची दखल शासनाने घेतली नसल्याने ५० हजार सह्यांचे निवेदन राज्यपाल यांना देण्यात येणार आहे.
या सह्यांच्या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, खासदार, या विभागाच्या सर्व आमदारांना देण्यात येणार आहे. सह्यांच्या शुभारंभ वेळी संभाजी जाधव, सुहास पाटील, विजय महाडिक, बाळासाहेब जाधव, शंकरराव पाटील, युवराज जाधव, अंकुश जाधव, शंकर चव्हाण, संजय पाटील, नितिन पाटील, आयुब हवालदार, उदय सरनोबत, राहुल पाटील, मारुती पाटील उपस्थित होते.