Sangli News: शिराळ्यात सत्यजीत देशमुख-सम्राट महाडिक 'साथ-साथ'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 13:17 IST2023-03-24T13:16:26+5:302023-03-24T13:17:07+5:30
आमच्यात दुफळी असल्याची विरोधकांकडून अफवा पसरवली जात आहे. मात्र या कार्यक्रमाची उपस्थिती विरोधकांना चपराक देणारी

Sangli News: शिराळ्यात सत्यजीत देशमुख-सम्राट महाडिक 'साथ-साथ'
शिराळा : शिराळा विधानसभा मतदारसंघात सत्यजीत देशमुख आणि सम्राट महाडिक यांच्यात कोणतेही मतभेद नाहीत, दोघेही एकत्रच काम करीत आहेत व करणार आहेत. या दोघांच्या एकत्रितपणा तुन येथील विकास कामे पूर्ण होतील असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केले. यावेळी त्यांनी शिराळा नागपंचमी व छत्रपती संभाजी महाराज स्मृतिस्थळ विकसित करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
भाजपच्या लोकसभा प्रवास अभियान अंतर्गत आयोजित लाभार्थी सवांद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सत्यजीत देशमुख, भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सम्राट महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती.
मंत्री सिंधिया म्हणाले की, या अगोदर अनेक वर्षांपासून या देशावर भ्रष्टाचारी शासन होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज भारत ही विश्वाची औषध बनवणारी राजधानी ठरली आहे .आपला देश२०३० पर्यंत जगातील पाचव्या क्रमांकाचा आर्थिक शक्तिशाली देश बनेल. शिराळ्याची भूमी संकल्प आणि बलिदानाची भूमी आहे. या परिसराचा विकास करण्याचे आमचे ध्येय आहे. शिराळ्याच्या नागपंचमी बाबत पर्यावरण मंत्री यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करीन. भुईकोट किल्ल्यावर श्री छत्रपती संभाजी महाराज स्मृतिस्थळ विकसित करण्यासाठी सहकार्य करीन असे सांगितले.
सत्यजीत देशमुख म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज स्मृतिस्थळ विकसित करण्यासाठी व नागपंचमी पारंपरिक पद्धतीने साजरी होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, अंत्योदय योजनेची उत्पन्नाची मर्यादा वाढवावी अशी मागणी केली.
सम्राट महाडिक यांनी, आगामी सर्व निवडणूकीत सत्यजीत देशमुख व आम्ही एकत्रित काम करून विजय मिळवू.आमच्यात दुफळी असल्याची विरोधकांच्या कडून अफवा पसरवली जात आहे मात्र या कार्यक्रमाची उपस्थिती ही विरोधकांना चपराक आहे असे सांगितले.
यावेळी मकरंद देशपांडे , जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार भगवानराव साळुंखे, संपतराव देशमुख, माजी नगरसेवक केदार नलवडे, रणजितसिंह नाईक, समरजित घाटगे, निशिकांत पाटील, सी बी पाटील आदी. उपस्थित होते.
विरोधकांना चपराक : सम्राट महाडिक
महाडिक म्हणाले, आगामी सर्व निवडणुकीत सत्यजित देशमुख व आम्ही एकत्रित काम करुन विजय मिळवू, आमच्यात दुफळी असल्याची विरोधकांकडून अफवा पसरवली जात आहे. मात्र या कार्यक्रमाची उपस्थिती विरोधकांना चपराक देणारी आहे.