Sangli ZP Election Voting 2026: तासगाव तालुक्यात दुपारी १:३० वाजेपर्यंत ३४.६२ टक्के मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 15:21 IST2026-02-07T15:20:32+5:302026-02-07T15:21:03+5:30

तासगाव: सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळी ७:३० वाजल्यापासून सुरुवात झाली. तासगाव तालुक्यात मतदानाची प्रक्रिया ...

Sangli ZP Election Voting 2026: 34 percent voting in Tasgaon taluka till 1:30 pm | Sangli ZP Election Voting 2026: तासगाव तालुक्यात दुपारी १:३० वाजेपर्यंत ३४.६२ टक्के मतदान

Sangli ZP Election Voting 2026: तासगाव तालुक्यात दुपारी १:३० वाजेपर्यंत ३४.६२ टक्के मतदान

तासगाव: सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळी ७:३० वाजल्यापासून सुरुवात झाली. तासगाव तालुक्यात मतदानाची प्रक्रिया शांततेत सुरू आहे. सकाळी ७:३० ते दुपारी १:३० या सहा तासांत तालुक्यात ३४.६२% इतके मतदान झाले आहे.

मिळालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, तासगाव तालुक्यातील १२ जिल्हा परिषद निवडणूक विभाग आणि ६ पंचायत समिती गणांसाठी मतदान होत आहे. तालुक्यात एकूण १,८९,६१४ मतदार आहेत, ज्यामध्ये ९६,६२१ पुरुष आणि ९२,९८८ महिला मतदारांचा समावेश आहे. दुपारी १:३० वाजेपर्यंत एकूण ६५,६४६ मतदारांनी आपला हक्क बजावला आहे. मतदानामध्ये ३६,२५२ पुरुष तर २९,३९३ महिलांनी सहभाग घेतला आहे.

सकाळच्या वेळी मतदानाचा वेग काहीसा मंद होता, मात्र दुपारी ११ नंतर मतदारांच्या रांगा वाढू लागल्याचे दिसून आले.

वेळ - मतदानाची टक्केवारी 

  • सकाळी ९:३० पर्यंत - ६.८९% 
  • सकाळी ११:३० पर्यंत - १९.७०% 
  • दुपारी १:३० पर्यंत - ३४.६२% 

Web Title : सांगली ZP चुनाव 2026: तासगांव में दोपहर 1:30 बजे तक 34.62% मतदान

Web Summary : सांगली ZP चुनावों के लिए तासगांव में शांतिपूर्ण मतदान हुआ। दोपहर 1:30 बजे तक 1,89,614 पंजीकृत मतदाताओं में से 34.62% ने वोट डाले। सुबह मतदान धीमा रहा, लेकिन 11 बजे के बाद गति पकड़ी।

Web Title : Sangli ZP Election 2026: Tasgaon sees 34.62% voter turnout till 1:30 PM

Web Summary : Tasgaon witnessed peaceful voting for Sangli ZP elections. By 1:30 PM, 34.62% of the 1,89,614 registered voters had cast their ballots. Polling started slow but picked up after 11 AM.