Sangli Municipal Election Results 2026: सांगली महापालिकेत २८ नगरसेवकांची पुन्हा एन्ट्री; दिग्गजांना नाकारले, १८ जणांना पराभवाचा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 19:27 IST2026-01-17T19:22:37+5:302026-01-17T19:27:18+5:30

सांगली : सांगली , मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीत २८ नगरसेवकांची पुन्हा एन्ट्री झाली आहे. यात माजी महापौर, स्थायी ...

Sangli Municipal Election Results 2026 28 corporators re enter Sangli Municipal Corporation, 18 suffer defeat | Sangli Municipal Election Results 2026: सांगली महापालिकेत २८ नगरसेवकांची पुन्हा एन्ट्री; दिग्गजांना नाकारले, १८ जणांना पराभवाचा धक्का

Sangli Municipal Election Results 2026: सांगली महापालिकेत २८ नगरसेवकांची पुन्हा एन्ट्री; दिग्गजांना नाकारले, १८ जणांना पराभवाचा धक्का

सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीत २८ नगरसेवकांची पुन्हा एन्ट्री झाली आहे. यात माजी महापौर, स्थायी समितीच्या माजी सभापतींसह दिग्गज नेत्यांच्या मुलांचा समावेश आहे, तर १८ माजी नगरसेवकांना पराभवाचा धक्का बसला आहे. त्यात भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, माजी विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांच्यासारख्या दिग्गजांचा समावेश आहे.

महापालिकेच्या निवडणुकीत मागील सभागृहातील सदस्यांसह माजी नगरसेवकही रिंगणात उतरले होते. यात काही माजी नगरसेवकांना यश आले तर काहींना पराभवाचा धक्का बसला. माजी महापौर मैनुद्दीन बागवान, दिग्विजय सूर्यवंशी यांनी मोठ्या फरकाने विजय मिळविला. स्थायी समितीचे माजी सभापती राहिलेल्या धीरज सूर्यवंशी, निरंजन आवटी, संदीप आवटी यांनी आपले गड राखले. 

आमदार इद्रीस नायकवडी यांचे पुत्र अतहर नायकवडी, माजी महापौर किशोर जामदार यांचे पुत्र करण जामदार हेही विजयी झाले. गत सभागृहातील भाजपचे संतोष पाटील, जगन्नाथ ठोकळे, प्रकाश मुळके, स्वाती शिंदे, लक्ष्मण नवलाई, पद्मश्री पाटील, रोहिणी पाटील, गणेश माळी, संजय यमगर, लक्ष्मी सरगर, काँग्रेसचे संजय मेंढे, मंगेश चव्हाण, फिरोज पठाण,

बबिता मेंढे, वर्षा निंबाळकर, मयूर पाटील, राष्ट्रवादी (अजित पवार)चे विष्णू माने, अभिजित भोसले, नसीमा नाईक, गजानन मगदूम, तर शिंदेसेनेचे युवराज बावडेकर यांनी विजय मिळविला. याचवेळी अनेक दिग्गज माजी नगरसेवकांना पराभवाचा धक्काही सहन करावा लागला.

Web Title : सांगली नगर निगम चुनाव: 28 पार्षद फिर से निर्वाचित, दिग्गजों को नकारा गया

Web Summary : सांगली नगर निगम चुनाव में 28 पार्षद फिर से निर्वाचित हुए, जिनमें पूर्व महापौर और समिति प्रमुख शामिल हैं। प्रकाश ढंग जैसे प्रमुख चेहरों को हार का सामना करना पड़ा। कुछ पूर्व पार्षदों ने बड़े अंतर से जीत हासिल की, जबकि अन्य हार गए। राजनीतिक नेताओं के बेटों ने भी जीत हासिल की।

Web Title : Sangli Municipal Election: 28 Councilors Re-elected, Veterans Rejected in 2026

Web Summary : Sangli's municipal election saw 28 councilors re-elected, including former mayors and committee heads. Prominent figures like Prakash Dhang faced defeat. Former corporators faced mixed results, with some winning by large margins and others losing. Sons of political leaders also secured victories.