सांगली जिल्ह्यात मे महिन्यात विक्रमी जीएसटी संकलन, किती कोटींची झाली वसुली.. जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 16:12 IST2025-06-07T16:10:35+5:302025-06-07T16:12:38+5:30

कडक कारवाईमुळे संकलनात वाढ

Record GST collection in Sangli district in May | सांगली जिल्ह्यात मे महिन्यात विक्रमी जीएसटी संकलन, किती कोटींची झाली वसुली.. जाणून घ्या

संग्रहित छाया

मिरज : आता जिल्ह्यात नवीन आर्थिक वर्षात मे महिन्यात १८९ कोटी जीएसटी संकलन झाले आहे. गत आर्थिक वर्षात मे महिन्यातील १३५ कोटी महसुलापेक्षा यावर्षी सुमारे ५४ कोटी म्हणजेच ४० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. गत आर्थिक वर्षात एकूण १४३६ कोटींच्या जीएसटी महसूल वसुली झाली आहे.

नवीन आर्थिक वर्षाच्या दोन पहिल्या दोन महिन्यांत विक्रमी जीएसटी महसूल जमा झाला असून, एप्रिल व मे महिन्यांत ३७२ कोटी करसंकलन झाले आहे. गतवर्षी एप्रिल ते मे महिन्यात ३०६ कोटींचे संकलनापेक्षा यावर्षी जीएसटी महसुलात ६६ कोटी म्हणजेच २२ टक्के वाढ झाली आहे. महाराष्ट्र राज्यात मे २०२५ मध्ये २२ हजार ५३४ कोटी जीएसटी महसूल जमा झाला आहे. गतवर्षीच्या मे २०२४ महिन्याच्या २०४४० कोटी महसुलाच्या तुलनेत १० टक्क्यांपेक्षा जादा करसंकलन या महिन्यात झाले.

कडक कारवाईमुळे संकलनात वाढ

जिल्ह्यात वाहनांचे सुटे भाग,साखर, मोलासिस, इथेनॉल, सोने-चांदी दागिने, बेदाणा, दुग्धजन्य पदार्थ आदी वस्तू, तर बिल्डर्स, रस्ते, विद्युत व जलसिंचन ठेकेदार, शीतगृहे, कमिशन एजंट आदी सेवा पुरवठादारांचे मोठे योगदान कर महसुलात आहे. कर चुकवेगिरी करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई, विशेषतः बनावट बिले तयार करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई, बोगस नोंदणी करणाऱ्या विरुद्ध केंद्र व राज्य विभागाने केलेल्या कारवायांमुळेही जीएसटी महसूल संकलन वाढले आहे.

Web Title: Record GST collection in Sangli district in May

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.