Sangli: मिरजेत पंजाबी तरुणाने दाखवला मराठीचा बाणा, हातात पोस्टर घेऊन नागरिकांचे वेधले लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 15:18 IST2025-07-10T15:18:37+5:302025-07-10T15:18:59+5:30
पंजाबी तरुणाने मराठी भाषा प्रेम व अस्मिता दाखवून दिली

Sangli: मिरजेत पंजाबी तरुणाने दाखवला मराठीचा बाणा, हातात पोस्टर घेऊन नागरिकांचे वेधले लक्ष
मिरज : राज्यात भाषिक वादाच्या पार्श्वभूमीवर मिरजेत राहणाऱ्या पंजाबी व्यावसायिकांनी महाराणा प्रताप चौकात हातात पोस्टर घेऊन मी पंजाबी मात्र मी महाराष्ट्राचा, मी मराठीच बोलतो, मला मराठी भाषेचा अभिमान असल्याचे पोस्टर घेऊन नागरिकांचे लक्ष वेधले.
राज्यात मराठी व अमराठीवरून जोरदारपणे वाद सुरू असताना मात्र मिरजेत एका दलजितसिंग रामगडिया या मिरजेतील पंजाबी तरुणाने कडून हातात पोस्टर घेऊन मराठीचा अभिमान असल्याचे पोस्टर फडकावले. भरचौकात मराठीचा अभिमान असल्याचे जाहीर करणाऱ्या दलजितसिंग यांच्याकडे येणारे जाणारे नागरिकांनी कुतुहलाने पाहत गर्दी केली.
मिरजेत व्यवसायानिमित्त अनेक पंजाबी कुटुंबे स्थायिक आहेत. ही सर्व पंजाबी मंडळी मराठी संस्कृतीशी एकरूप झाली असून अस्खलित मराठी बोलतात. मिरज शहरात दलजित सिंग यांचे कुटुंबीय १९७० पासून वास्तव्यास आहे. मिरज औद्योगिक वसाहतीत त्यांचा वे ब्रिजचा व्यवसाय आहे. त्यांच्या दोन पिढ्या व आता तिसरी पिढीही मराठी शाळेत शिकत असल्याचे सांगितले.
मराठीही आपली मातृभाषा
दलजितसिंग राम गाडिया या पंजाबी तरुणाने मराठी भाषा प्रेम व अस्मिता दाखवून दिली. मी जरी पंजाबी असलो तरी माझे येथील संस्कार मराठी आहेत व मराठी बोलतो असे त्यांनी सांगितले. मराठीही आपली मातृभाषा आहे, आपण सर्वजण ही मराठीतच बोला, असे आवाहन दलजितसिंग यांनी केले.