सांगलीतील आळतेमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची रातोरात प्रतिष्ठापना, पोलिस बंदोबस्तात पुतळा काढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2023 14:44 IST2023-01-25T14:41:38+5:302023-01-25T14:44:03+5:30

पुतळा कुणी उभारला याचा तपास सुरु

Overnight installation of Shivaji Maharaj's statue in Alte Sangli district | सांगलीतील आळतेमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची रातोरात प्रतिष्ठापना, पोलिस बंदोबस्तात पुतळा काढला

सांगलीतील आळतेमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची रातोरात प्रतिष्ठापना, पोलिस बंदोबस्तात पुतळा काढला

दत्ता पाटील

तासगाव : तासगाव तालुक्यातील आळते येथे अज्ञात शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची रातोरात प्रतिष्ठापना केली. मागील वर्षी पुतळा बसवण्याचा असाच प्रयत्न झाला होता, मात्र तो  प्रशासनाने पुतळा काढून ग्रामपंचायतीच्या ताब्यात दिला होता. आता पुन्हा हाच पुतळा उभारला गेल्याने हा पुतळा कुणी उभारला याचा तपास केला जात आहे.

गावात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस आणि आळते ग्रामस्थांच्यामध्ये चर्चा केली. यावेळी पोलिस निरीक्षक भानुदास निंभोरे, निवासी नायब तहसीलदार नागेश गायकवाड यांच्या उपस्थितीत स्थानिक नागरिकांसोबत चर्चा करून विधिवत पूजा करून पुतळा काढण्यात आला. पुतळा पंचायत समितीच्या ताब्यात देण्यात आला. पोलीस बंदोबस्तात पुतळा काढला.

Web Title: Overnight installation of Shivaji Maharaj's statue in Alte Sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.