पाच दिवसांपूर्वी लग्न, सहाव्या दिवशीच तरुणाने संपवले जीवन; सांगली जिल्ह्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 13:57 IST2023-12-12T13:57:16+5:302023-12-12T13:57:51+5:30
जत : मुचंडी (ता. जत) येथील परसा शिवानंद जालिहाळ (वय २६) याने शिंदी मळा येथे झाडाला गळफास लावून आत्महत्या ...

पाच दिवसांपूर्वी लग्न, सहाव्या दिवशीच तरुणाने संपवले जीवन; सांगली जिल्ह्यातील घटना
जत : मुचंडी (ता. जत) येथील परसा शिवानंद जालिहाळ (वय २६) याने शिंदी मळा येथे झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना सकाळी नऊ वाजता उघडकीस आली.
जत ग्रामीण रुग्णालयात त्यास उपचारासाठी आणले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. परसा याचे पाचच दिवसांपूर्वी लग्न झाले होते.
मात्र, त्याला लग्न मान्य नव्हते. या नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याची माहिती नातेवाइकांनी सांगितले. जत पोलिसांत रात्री उशिरा घटनेची नोंद झाली आहे.