काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार जयश्रीताई पाटील यांची मालमत्ता १५ कोटींची
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 16:07 IST2024-10-30T16:05:08+5:302024-10-30T16:07:53+5:30
कोणताही गुन्हा नोंद नाही

काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार जयश्रीताई पाटील यांची मालमत्ता १५ कोटींची
सांगली : काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार जयश्रीताई पाटील यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार, त्यांच्या नावे १५ कोटी २२ लाख ३१ हजार रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता आहे. त्यांच्या नावे २ कोटी ७९ लाखांचे कर्जही आहे.
जयश्रीताई पाटील यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. त्याबाबत प्रतिज्ञापत्रात उल्लेख करण्यात आला आहे. जयश्रीताई पाटील यांच्या नावे असलेल्या कर्जाचा तपशीलही देण्यात आला आहे. जयश्रीताई पाटील यांचे शिक्षण बी.ए.पर्यंत झाले आहे. मुंबई विद्यापीठातून त्यांनी कला शाखेची पदवी प्राप्त केली आहे. दहावीपर्यंतचे शिक्षण कल्याण येथील शारदा मंदिर हायस्कूलमध्ये तर बारावीपर्यंतचे शिक्षण माटुंगा येथील रुइया महाविद्यालयात झाले आहे.
संपत्तीचे विवरण असे
- जंगम मालमत्ता : ५,५१,५४,०९३
- स्थावर मालमत्ता : ९,७०,७६,९५२
- कर्ज : २,७९,२२,१०५