सांगली लोकसभेसाठी ११.४३ टक्के मतदान; मतदारांचा उत्साह, अनेक ठिकाणी रांगा

By अशोक डोंबाळे | Published: May 7, 2024 11:04 AM2024-05-07T11:04:03+5:302024-05-07T11:04:39+5:30

सांगली लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत एकूण २० उमेदवार रिंगणात आहेत.

Loksabha Election 2024 - 11.43 percent polling for Sangli Lok Sabha; voters queues in many places | सांगली लोकसभेसाठी ११.४३ टक्के मतदान; मतदारांचा उत्साह, अनेक ठिकाणी रांगा

सांगली लोकसभेसाठी ११.४३ टक्के मतदान; मतदारांचा उत्साह, अनेक ठिकाणी रांगा

सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी सकाळपासून उत्साहात मतदान सुरू झाले आहे. सकाळी ९ वाजेपर्यंतच्या दोन तासात केवळ ५.८१ टक्के मतदान झाले होते. साडेनऊ नंतर मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी झाल्यामुळे साडेदहा वाजेपर्यंत सरासरी ११.४३ टक्केपर्यंत मतदान झाले. अनेक ठिकाणी मतदानासाठी रांगा दिसून आल्या.

सांगली लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत एकूण २० उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी सकाळी ७ पासून मतदानाला सुरुवात झाली. शहराबरोबरच ग्रामीण भागातही मतदानाचा उत्साह दिसून आला. अनेक ठिकाणी मतदारांनी रांगा लावल्या होत्या. सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत या दोन तासात मतदारसंघात सरासरी ५.८१ टक्के मतदान झाल्याची माहिती देण्यात आली आहे. सकाळी साडेदहा वाजता मतदान केंद्रावर मतदारांनी रांगा केल्या होत्या. सरासरी ११.४३ टक्के मतदान झाले होते. पण, साडेनऊ नंतर मतदानात मोठी वाढ झाली आहे. सद्या सांगली, मिरज शहरासह जिल्ह्यातील मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या आहेत.

Web Title: Loksabha Election 2024 - 11.43 percent polling for Sangli Lok Sabha; voters queues in many places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.