मिरज सिव्हिलमधून चोरलेल्या बाळ-मातेचे डीएनए नमुने जुळले, प्रयोगशाळा अहवाल प्राप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 11:59 IST2025-06-20T11:58:46+5:302025-06-20T11:59:19+5:30

कारवाईच्या अहवालावर अद्याप निर्णय नाही

DNA samples of mother and baby stolen from Miraj Civil match, lab report received | मिरज सिव्हिलमधून चोरलेल्या बाळ-मातेचे डीएनए नमुने जुळले, प्रयोगशाळा अहवाल प्राप्त 

मिरज सिव्हिलमधून चोरलेल्या बाळ-मातेचे डीएनए नमुने जुळले, प्रयोगशाळा अहवाल प्राप्त 

मिरज : मिरज सिव्हिल हॉस्पिटलमधून बाळ चोरि प्रकरणी कविता आलदर हीं माता व त्यांच्या बाळाच्या डीएनए चाचणीचे नमुने जुळले आहेत. यामुळे पोलिसांनी हस्तगत केलेले बाळ कविता यांचेच असल्याचे स्पष्ट झाले. पुणे येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा डिएनए अहवाल पोलिसांना मिळाला आहे. 

मिरज सिव्हिल मधून एक महिन्यापूर्वी प्रसुती विभागातून तीन दिवसाचे पुरुष जातींचे नवजात अर्भक चोरून नेण्यात आले होते. बाळचोरी प्रकरणी पोलिसांनी सारा साठे या महिलेस अटक करून तिच्याकडून चोरलेले बाळ हस्तगत केले . मात्र सारा साठे या महिलेने बाळ तिचेच असल्याचा पवित्रा घेतला होता. यामुळे हस्तगत केलेले बाळ कविता आलदर या मातेचेच असल्याचे निश्चित करण्यासाठी पोलिसांनी बाळ व मातेच्या डीएनए चाचणीचा निर्णय घेतला. 

सिव्हिल रुग्णालयात बाळ व माता दोघांचेही नमुने घेऊन तपासणी साठी पुण्याला पाठविण्यात आले. या तपासणीत माता व बाळाचे डिएनए नमुने जुळले असल्याने हा अहवाल सारा साठे हिच्याविरुद्ध पुरावा म्हणून न्यायालयात सादर होणार असल्याचे गांधी चौक पोलिस ठाण्याचे सहाय्य्क निरीक्षक संदीप शिंदे यांनी सांगितले. 

कारवाईच्या अहवालावर अद्याप निर्णय नाही

महाविद्यालय प्रशासनाने नियुक्त केलेल्या पाच जणांच्या चौकशी समितीने रुग्णालयातून बाळ चोरून नेण्यास प्रसूती वार्डातील परिचारिकाना जबाबदार ठरविले आहे. चौकशी समितीच्या अहवालानुसार परिचारिकांवर कारवाईस परिचारिका संघटनेने विरोध केलास आहे. परिचारिकवर कारवाईसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडे अहवाल पाठविण्यात आला मात्र त्यावर अद्याप निर्णय झाला नसल्याचे सिव्हिल प्रशासनाने सांगितले.

Web Title: DNA samples of mother and baby stolen from Miraj Civil match, lab report received

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.