बजेटवरून वादाची ठिणगी, सांगली महापालिकेत महापौर-आयुक्तांमध्ये संघर्षाची चिन्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 18:53 IST2026-02-21T18:52:40+5:302026-02-21T18:53:39+5:30

नूतन पदाधिकाऱ्यांची नाराजी

Debate sparks over budget, signs of conflict between Mayor and Commissioner in Sangli Municipal Corporation | बजेटवरून वादाची ठिणगी, सांगली महापालिकेत महापौर-आयुक्तांमध्ये संघर्षाची चिन्हे

बजेटवरून वादाची ठिणगी, सांगली महापालिकेत महापौर-आयुक्तांमध्ये संघर्षाची चिन्हे

सांगली : महापालिकेतील प्रशासक राज संपून लोकनियुक्त सदस्यांचा कारभार सुरू झाला आहे. कारभाराच्या सुरुवातीलाच पदाधिकारी आणि प्रशासनात संघर्षाची ठिणगी पडली आहे. यंदाच्या अंदाजपत्रकावरून वाद निर्माण झाल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.

महापालिकेत गेली अडीच वर्षे प्रशासक राज होते. जानेवारी महिन्यात महापालिकेच्या निवडणुका झाल्या त्यानंतर १० फेब्रुवारी रोजी महापौर, उपमहापौर निवडी पार पडल्या. महापालिकेतील राजकीय पक्षांच्या गटनेत्यांनीही पदभार स्वीकारत कामकाजाला सुरुवात केली. महापौर धीरज सूर्यवंशी, उपमहापौर गजानन मगदूम, विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी विविध विभागाच्या बैठका घेत प्रलंबित प्रश्नांना गती देण्याचा प्रयत्न चालवला आहे.

अडीच वर्षांच्या काळात प्रशासनच महापालिकेचा कारभार हाकत होते. आता पदाधिकाऱ्यांनी कारभार हातात घेतल्यानंतर संघर्ष सुरू झाला आहे. त्यात महापालिकेच्या अंदाजपत्रकावरून पहिली ठिणगी पडली आहे. सध्या प्रशासनाकडून अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी आयुक्ताने सर्व विभागाच्या बैठकाही घेतल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने नुकतेच प्रशासकीय अंदाजपत्रक महासभेकडे सादर करण्याची मागणी महापौर धीरज सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे. 

त्यानंतर महापौरांनी हे आयुक्तांसह अधिकाऱ्यांना त्या संदर्भात सूचना दिल्या होत्या, पण आयुक्तांकडून त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे महापौर सूर्यवंशी आक्रमक झाले आहेत. यावरून आयुक्तांशी संघर्षाची चिन्हे दिसू लागली आहेत. त्याचीच चर्चा महापालिका वर्तुळात दिवसभर रंगली होती.

Web Title : बजट पर विवाद: सांगली के महापौर और आयुक्त में टकराव के आसार।

Web Summary : सांगली महानगरपालिका में बजट को लेकर नवनिर्वाचित महापौर और आयुक्त के बीच मतभेद सामने आने से तनाव बढ़ गया है। महापौर द्वारा प्रशासनिक बजट पेश करने के दबाव का विरोध हो रहा है, जिससे संभावित संघर्ष के संकेत मिल रहे हैं।

Web Title : Budget sparks row: Sangli Mayor and Commissioner face conflict.

Web Summary : Tensions rise in Sangli Municipal Corporation as disagreements over the budget surface between the newly elected Mayor and the Commissioner. The Mayor's push for administrative budget presentation faces resistance, hinting at a potential conflict.