Sangli Municipal Election Results 2026: सांगलीत बिग फाईट प्रभागाकडे लक्ष 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 10:06 IST2026-01-16T10:04:03+5:302026-01-16T10:06:07+5:30

मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात

Attention to Big Fight ward in Sangli Municipal Corporation election results | Sangli Municipal Election Results 2026: सांगलीत बिग फाईट प्रभागाकडे लक्ष 

Sangli Municipal Election Results 2026: सांगलीत बिग फाईट प्रभागाकडे लक्ष 

सांगली : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात होते आहे. यंदाच्या निवडणुकीत तब्बल 15 प्रभागात दिग्गज उमेदवार रिंगणात उतरल्याने बिग फाईट झाली आहे. याच प्रभागात मतदानाची टक्केवारी ही इतरांच्या तुलनेत अधिक दिसून येते त्यामुळे या बिग फाईट लढतीकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

सांगलीतील प्रभाग क्रमांक 9 मध्ये सर्वसाधारण गटामध्ये भाजपचे अतुल माने व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी नगरसेवक मनगू सरगर यांच्यात लढत झाली. प्रभाग क्रमांक 18 मध्ये वसंतदादांचे पणतू व खासदार विशाल पाटील यांचे पत्नी हर्षवर्धन पाटील व भाजपचे माजी नगरसेवक मनोज सरगर यांच्यात काटा लढत झाली आहे.

प्रभाग क्रमांक 12 मध्ये भाजपचे धीरज सूर्यवंशी व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अभिजीत उर्फ मनोज फर्णे, प्रभाग क्रमांक 14 मध्ये भाजपचे बंडखोर व शिंदे सेनेचे उमेदवार माजी नगरसेवक युवराज बावडेकर व भाजपचे विजय साळुंखे, प्रभाग क्रमांक 16 मध्ये काँग्रेस कडून माजी नगरसेवक मयूर पाटील व भाजपचे माजी नगरसेवक उत्तम साखळकर,

प्रभाग क्रमांक एक मध्ये भाजपचे चेतन सूर्यवंशी व काँग्रेसचे माजी नगरसेवक विजय घाडगे, प्रभाग दोन मध्ये भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक प्रकाश ढग व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी नगरसेवक गजानन मगदूम, प्रभाग क्रमांक तीन मध्ये भाजपचे संदीप आवटी व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दिगंबर जाधव,

प्रभाग चार मध्ये भाजपचे निरंजन आवटी व अपक्ष शैलेश देशपांडे, प्रभाग क्रमांक २० मध्ये आमदार इदरीस नायकवडी यांचे पुत्र अतहर नायकवडी भाजपचे माजी नगरसेवक योगेंद्र थोरात व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अभिजीत हारगे अशा चुरशीच्या लढती झाल्या आहेत. या प्रभागातील निकालाबाबत उत्सुकता आहे.

Web Title : सांगली नगर निगम चुनाव 2026: सबकी निगाहें मुख्य मुकाबलों पर।

Web Summary : सांगली को नगर निगम चुनाव के नतीजों का इंतजार है। पंद्रह वार्डों में बीजेपी, एनसीपी गुटों और कांग्रेस उम्मीदवारों के बीच कड़ी टक्कर है। अधिक मतदान प्रतिशत से इन महत्वपूर्ण लड़ाइयों के नतीजों के लिए उत्सुकता बढ़ गई है।

Web Title : Sangli Municipal Election 2026: Key battles in focus.

Web Summary : Sangli awaits municipal election results. Fifteen wards feature intense contests between BJP, NCP factions, and Congress candidates. High voter turnout fuels anticipation for these crucial battles.