Sangli Municipal Election 2026: जातप्रमाणपत्र पडताळणीसाठी २२४ उमेदवारांचे अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 16:46 IST2026-01-01T16:46:02+5:302026-01-01T16:46:57+5:30
निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या अर्जांची छाननी सुरू

Sangli Municipal Election 2026: जातप्रमाणपत्र पडताळणीसाठी २२४ उमेदवारांचे अर्ज
सांगली : महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आरक्षित प्रवर्गांमधून निवडणूक लढविणाऱ्या २२४ उमेदवारांच्या अर्जांची छाननी सुरू आहे, अशी माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य सचिव मेघराज भाते यांनी दिली आहे.
महानगरपालिकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर, आरक्षित प्रवर्गांच्या उमेदवारांसाठी अर्ज नामनिर्देशनाची अंतिम दि. ३० डिसेंबर होती. सांगली, मिरज आणि कुपवाड या महानगरपालिका क्षेत्रांतर्गत सांगली शहरातून १०९, मिरजेतून ४०, कुपवाड २३ आणि इतर ठिकाणांहून ५२ अर्ज आले आहेत.
समितीचे सचिव भाते म्हणाले, उमेदवारांच्या अर्जाची पडताळणी चालू आहे. जातप्रमाणपत्रांची योग्य त्याप्रकारे पडताळणी केली जाईल. ही प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्षपणे होईल याची खात्री समितीने दिली आहे. हे अर्ज जमा झाल्यानंतर, समिती लवकरच अंतिम निवड जाहीर करेल.