द्राक्ष बागेतील तोडली झाडे, आठ जणा विरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2021 17:17 IST2021-11-18T17:08:14+5:302021-11-18T17:17:44+5:30

टाकळी : जनराववाडी (ता. मिरज ) येथील शेतकरी राहुल राजगोंडा विरोजे यांच्या शेतातील द्राक्ष झाडे कुऱ्हाडीने तोडून सुमारे तीन ...

Anonymously cut down trees in the vineyard, filed charges against eight people | द्राक्ष बागेतील तोडली झाडे, आठ जणा विरोधात गुन्हा दाखल

द्राक्ष बागेतील तोडली झाडे, आठ जणा विरोधात गुन्हा दाखल

टाकळी : जनराववाडी (ता. मिरज) येथील शेतकरी राहुल राजगोंडा विरोजे यांच्या शेतातील द्राक्ष झाडे कुऱ्हाडीने तोडून सुमारे तीन लाखांचे नुकसान केले. याबाबत मिरज ग्रामीण पोलिसांत आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल विरोजे हे बुधवारी दिवसभर द्राक्ष बागेत काम करून कुटुंबियांसमवेत झोपी गेले होते. दरम्यान मध्यरात्री सुमारे २ च्या सुमारास कुत्र्याच्या भुंकण्याच्या आवाजाने विरोजे जागे झाले, असता त्यांना सात ते आठ जण द्राक्ष बागेतील झाडे तोडत असल्याचे निदर्शनास आले.

धावत घराकडे जाऊन त्यांनी भाऊ आई- वडिलांना उठवले. त्यांनी बॅटरी मारून पाहिले असता प्रमोद रुद्रगोंडा पाटील, सातगोंडा रुद्रगोंडा पाटील, किरण गंगधर पाटील, दादासाहेब बाबगोंडा पाटील, सिदगोंडा बाबगोंडा पाटील, मनोज रावसाहेब पाटील (सर्व रा. बेळंकी) यांच्यासह अज्ञात दोघे कुऱ्हाडीने झाडे तोडत असल्याचे दिसले. सर्वांच्या हातात कुऱ्हाड असल्याने राहुल विरोजे हे आरडाओरडा न करता घरी जाऊन झोपले. त्यानंतर सकाळी त्यांनी पोलीस पाटील दत्ताजीराव कुंडले यांना याची माहिती दिली. नंतर या संशयित आठ जणांविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीवरुन मिरज ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: Anonymously cut down trees in the vineyard, filed charges against eight people