फुपेरेत बिबट्याच्या हल्ल्यात 3 शेळ्या, बोकड ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 13:17 IST2021-05-10T13:14:59+5:302021-05-10T13:17:00+5:30

wildlife Shirala Sangli : फुपेरे (ता शिराळा) येथील राजेश शामराव शिवमारे यांच्या जनावरांच्या वस्तीवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात 3 शेळ्या व बोकड ठार झाला .या घटनेत शिवमारे यांचे सुमारे पन्नास हजारांचे नुकसान झाले आहे .फुपेरे, शिराळे खुर्द, पुनवत, कणदूर भागात बिबट्या ठाण मांडून असून वनविभागाने त्याचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

3 goats, goat killed in leopard attack in Fupere | फुपेरेत बिबट्याच्या हल्ल्यात 3 शेळ्या, बोकड ठार

फुपेरेत बिबट्याच्या हल्ल्यात 3 शेळ्या, बोकड ठार

ठळक मुद्देफुपेरेत बिबट्याच्या हल्ल्यात 3 शेळ्या, बोकड ठारशिवमारे यांचे सुमारे पन्नास हजारांचे नुकसान

पुनवत : फुपेरे (ता शिराळा) येथील राजेश शामराव शिवमारे यांच्या जनावरांच्या वस्तीवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात 3 शेळ्या व बोकड ठार झाला. या घटनेत शिवमारे यांचे सुमारे पन्नास हजारांचे नुकसान झाले आहे .

फुपेरे, शिराळे खुर्द, पुनवत, कणदूर भागात बिबट्या ठाण मांडून असून वनविभागाने त्याचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे .

परिसरातील अनेक गावात कोरोना रुग्ण आहेत.त्यामुळे लोक अगोदरच चिंतीत आहेत. अशा अवस्थेत शेतात जावे तर बिबट्याचे भय आहे. त्यामुळे जायचे कुठे ?असा प्रश्न नागरिकांसमोर उभा ठाकला आहे . गेल्या आठ दिवसात कोरोना, बिबट्या व पावसाने लोक हैराण झाले आहेत.

Web Title: 3 goats, goat killed in leopard attack in Fupere