Municipal Election: सांगली महापालिका क्षेत्रात २५ हजार दुबार मतदारांना द्यावे लागणार हमीपत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 17:13 IST2025-11-26T17:13:22+5:302025-11-26T17:13:39+5:30

प्रारूप मतदार यादी : निवडणूक विभागाकडून तयारी; एकाच ठिकाणी होणार मतदान

25000 double voters in Sangli Municipal area will have to give an undertaking | Municipal Election: सांगली महापालिका क्षेत्रात २५ हजार दुबार मतदारांना द्यावे लागणार हमीपत्र

Municipal Election: सांगली महापालिका क्षेत्रात २५ हजार दुबार मतदारांना द्यावे लागणार हमीपत्र

सांगली : महापालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीत २४ हजार ६४४ दुबार मतदारांची नावे असल्याचे समोर आले आहे. या दुबार मतदारांना मतदानापूर्वी हमीपत्र लिहून द्यावे लागणार आहे. त्या दृष्टीने निवडणूक विभागाकडून तयारी सुरू झाली आहे. दुबार मतदारांना एकाच ठिकाणी मतदान करता येणार आहे.

महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रशासनाने प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली. २०१८ मध्ये निवडणुकीवेळी महापालिकेची मतदार संख्या ४ लाख २४ हजार १७९ इतकी होती. यंदा त्यात ३० हजार २४९ ने वाढ होऊन ४ लाख ५४ हजार ४२८ झाली आहे. प्रत्येक प्रभागात २१ ते २७ हजार मतदार आहेत. प्रारूप मतदार यादीत २४ हजार ६४४ दुबार नावे आहेत. या नावांसमोर स्टार करण्यात आले आहेत. या मतदारांकडून मतदानापूर्वी हमीपत्र लिहून घेतले जाणार आहे.

तसेच पहिल्या टप्प्यात दुबार नावाची यादी प्रसिद्ध करण्याची तयारी सुरू आहे. त्यानंतर प्रत्यक्ष दुबार मतदारांच्या घरापर्यंत पोहोचण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. त्यांना कोणत्या ठिकाणी मतदान करणार, अशी विचारणाही केली जाणार आहे. त्यासाठी महापालिकेने नियोजन हाती घेतले आहे.

प्रारूप यादीत अनेक त्रुटी

मतदार यादीत अनेक त्रुटी असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. स्थलांतरित नागरिक, चुकीचे पत्ते, मृत व्यक्तींची नावे कायम राहणे, एकाच मतदाराचे दोन किंवा अधिक ठिकाणी नाव असणे अशा अनेक त्रुटी मतदार यादीत दिसून येत आहेत.

प्रभाग १, ४ मध्ये सर्वाधिक दुबार नावे

महापालिका क्षेत्रात २० प्रभाग आहेत. त्यापैकी प्रभाग १ मध्ये १,६२५ व प्रभाग ४ मध्ये १,६०१ सर्वाधिक दुबार मतदार आहेत. तर मिरजेतील प्रभाग सहामध्ये सर्वांत कमी ७७० दुबार नावे आहेत.

इच्छुकांना भुर्दंड

प्रारूप मतदार यादी १५०० ते २००० पानांची आहे. या यादीसाठी इच्छुक उमेदवारांना साडेतीन ते चार हजार रुपये मोजावे लागत आहेत. त्यात यादीतील अनेक पानांवर एक अथवा दोनच मतदारांची नावे आहेत. त्यामुळे इच्छुकांच्या खिशाला कात्री लागली आहे.

मतदार यादीचा कार्यक्रम

मतदार यादीवर हरकती व सूचनांसाठी दि. २७ नोव्हेंबरपर्यंतची मुदत आहे. त्यानंतर ५ डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. मतदान केंद्राच्या ठिकाणी ८ डिसेंबर रोजी यादी प्रसिद्ध होईल आणि केंद्रनिहाय मतदार यादी १२ डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर दुबार मतदारांची तपासणी व अर्ज घेणे सुरू केले जाणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.

प्रभाग निहाय दुबार मतदारसंख्या
प्रभाग - मतदार

१- १,६२५
२- १,१६२
३- ९६८
४- १,२४३
५- १,०१४
६- ७७०
७- ९९९
८- १,३१४
९- १,५१३
१०- १,२७८
११- १,३८६
१२- १,१२५
१३- १,१६९
१४- १,५१३
१५- १,४०२
१६- १,६०१
१७- १,२५४
१८- १,०७४
१९- १,२२३
२०- १,०११
पुरुष १२,७४७
महिला ११,८९५
एकूण- २४,६४४

Web Title : सांगली: निगम चुनाव से पहले 25,000 दोहरे मतदाताओं को हलफनामा देना होगा

Web Summary : सांगली नगर निगम ने मसौदा सूची में 24,644 दोहरे मतदाताओं की पहचान की। इन मतदाताओं को चुनाव से पहले हलफनामा देना होगा। प्रशासन दोहरे नामों को प्रकाशित करने और मतदाता इरादों को सत्यापित करने की तैयारी कर रहा है। वार्ड 1 और 4 में सबसे अधिक दोहराव हैं। अंतिम मतदाता सूची 5 दिसंबर को जारी होगी।

Web Title : Sangli: 25,000 Duplicate Voters to Submit Affidavit Before Corporation Election

Web Summary : Sangli Municipal Corporation identifies 24,644 duplicate voters in draft list. These voters must submit affidavits before elections. The administration prepares to publish duplicate names and verify voter intentions. Ward 1 and 4 have the most duplicates. Final voter list releases December 5th.