lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > #साधेसकस : फक्त गावरान, ‘नॉन हायब्रिड’ धान्याचा आहारात समाावेश केला तर..

#साधेसकस : फक्त गावरान, ‘नॉन हायब्रिड’ धान्याचा आहारात समाावेश केला तर..

साधारण ८०-९०  वर्षांपूर्वी आपण जे अन्न खात होतो तेच खायचं. फक्त आता बदललेल्या आपल्या लाईफ स्टाईल नुसार त्याचं प्रमाण ठरवायचं.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 05:02 PM2021-03-20T17:02:00+5:302021-03-20T17:32:23+5:30

साधारण ८०-९०  वर्षांपूर्वी आपण जे अन्न खात होतो तेच खायचं. फक्त आता बदललेल्या आपल्या लाईफ स्टाईल नुसार त्याचं प्रमाण ठरवायचं.

use more non hybrid, native food, make it more nutritious. | #साधेसकस : फक्त गावरान, ‘नॉन हायब्रिड’ धान्याचा आहारात समाावेश केला तर..

#साधेसकस : फक्त गावरान, ‘नॉन हायब्रिड’ धान्याचा आहारात समाावेश केला तर..

Highlightsजमेल तसे देशी धान्य वापरू शकतो पण त्याच बरोबर विस्मरणात गेलेले आणि स्मरणात असलेले पण नेहमी न होणारे पदार्थ जेवणात आणू शकतो.सर्व फोटो- सौजन्य गुगल

भक्ती चपळगांवकर

साधेसकसच्या सुरुवातीच्या लेखात मी संतुलित आहाराबद्दल सांगितले. याच विषयी आरती देशपांडे दुघरेकर यांच्याशी चर्चा झाली. आरती विस्मरणात गेलेल्या धान्यांना जिवंत ठेवून ते लोकांपर्यंत पोचवण्याचे काम करतात. ICMR आणि AIMS म्हणजे ऑल इंडिया मेडिकल सायन्सेस नवी दिल्ली या दोन संस्थांनी मिळुन एक प्रयोग करायचा ठरवलं, ज्यामध्ये सुमारे शंभर लोकांना केवळ ऑरगॅनिक धान्य आणि तेही नेटिव्ह म्हणजे गावरान म्हणजेच नॉन हायब्रिड जातीचं, वापरुन बनवलेले अन्नच खायला द्यायचं. विशेष म्हणजे जे लोक डायबेटीस, बीपी, हार्ट डिसीज चे पेशंट आहेत त्यांना यात समाविष्ट केले. थोडक्यात असं की साधारण ८०-९० वर्षांपूर्वी आपण जे अन्न खात होतो तेच खायचं. फक्त आता बदललेल्या आपल्या लाईफ स्टाईल नुसार त्याचं प्रमाण ठरवायचं. या शंभर लोकांमध्ये काही हाय प्रोफाइल लोकांचा ही समावेश आहे. 


Living without medicine हा कन्सेप्ट आपल्या आयुष्यात आणणे शक्य आहे का? नसल्यास कमीत कमी औषधांची गरज पडेल असं आपल्या शरीराला तयार करायचं हा उद्देश या प्रयोगाचा आहे.
आरती यांचा या प्रयोगाशी संबंध आला. त्या या प्रयोगात सामील झालेल्या लोकांसाठी खपली गहु, गावरान चना, उडीद डाळ, सेंद्रिय गुळ असे सामान पुरवतात. तसेच दिल्ली, पंजाब, झारखंड च्या शेतकऱ्यांना या गावरान धान्याचं बी पण पुरवतात. सीड कंपन्यांच्या हायब्रिड सीड्स च्या जमान्यात खूप कमी लोकांकडे अस्सल गावरान बियाणे उरलं आहे. ते जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहचून जिवंत रहावं असा प्रयत्न आहे.
ICMR आणि AIMS सारख्या संस्थांनी मनावर घेतलंय त्यामुळे यापुढे आपले नेटिव्ह व्हरायचटीची आणि जुनी विस्मरणात गेलेली धान्य जिवंत राहतील आणि आपल्या आणि आपल्या पुढच्या पिढ्यांना परत समृद्ध पोषण देतील अशी आशा आरती यांना आहे.
अन्नाचे उत्पादन वाढवणे वाढत्या लोकसंख्येसाठी आवश्यक आहे. भारतात धान्य, तेलबिया, भाजीपाला, मसाले, फळफळावळ इत्यादींचे भरपूर उत्पादन होते. भारताच्या वाढत्या लोकसंख्येसाठी ते आवश्यक आहे. पण उत्पादन वाढवण्यासाठी, त्याचा दर्जा वाढवण्यासाठी आणि ते टिकावे म्हणून जे जनुकीय बदल त्यात केले जातात त्याचा परिणाम तब्येतीवर होतो. हा बदल पूर्णपणे नाकारणे आपल्याला शक्य नाही. तसेच मोठ्या लोकसंख्येला जास्त आणि पोषक आहार आता मिळतो ही अतिशय महत्वाची गोष्ट यामुळे शक्य झाली आहे हे ही नाकारता येणार नाही. पण सुखवस्तू घरात हे पोषण अति प्रमाणात झाल्याचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत. देशी वाण आरोग्यासाठी चांगले आहे, त्याची जपणूक आणि प्रसार करण्याचा प्रयत्न आयसीएमआर आणि एम्स सारख्या संस्था करत आहेत. शाळेचे तोंड न पाहिलेल्या पण मातीचिखल, शेण आणि लिंबाच्या पानांचा वापर करुन देशी बिया जपणाऱ्या राहीबाई सोमा पोपरेंसारखी बीजमाता आहे.


आता आपण घरबसल्या एक गोष्ट करु शकतो. जमेल तसे देशी धान्य वापरू शकतो पण त्याच बरोबर विस्मरणात गेलेले आणि स्मरणात असलेले पण नेहमी न होणारे पदार्थ जेवणात आणू शकतो. त्या त्या मोसमात पिकणाऱ्या भाज्या आपल्या घरातल्या मेन्यूत समाविष्ट करु शकतो. मग मुंबई, कोकणात मिळणाऱ्या पावसाळी भाज्या असोत किंवा उन्हाळ्यात खानदेशात घरोघरी तयार होणारी वाळवणं असोत. आज या पाककृती समाजमाध्यमांमुळे सगळीकडे उपलब्ध आहेत. एखादा पदार्थ लहानपणी चाखलेला असतो, आवडलेला असतो आणि चव अजून जिभेवर रेंगाळत असते. त्याची फेसबुकावर एखादी पोस्ट जरी टाकलीत तरी तुमच्यासारखे दहाजण तुम्हांला भेटतील आणि त्यातल्या एखाद्याला/एखादीला पाककृती पण आठवत असेल. तो पदार्थ पुन्हा तुमच्या ताटात आला तर एका खाद्यसंस्कृतीचा प्रवास निर्धोक सुरू राहणार आहे.

(लेखिका खाद्यसंस्कृती, कुटूंब, माध्यम संबंधी लिखाण करतात आणि फेसबुकवर लोकप्रिय असलेला ‘मुंबई स्वयंपाकघर’ हा ग्रुपही त्यांनी सुरु केलेला आहे. )
‘मुंबई स्वयंपाकघर’
https://www.facebook.com/groups/606730686147413/

Web Title: use more non hybrid, native food, make it more nutritious.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.