तुळस-कोरफड-गावठी गुलाब यांना तुमच्या घरातल्या कोपऱ्यात जागा द्या, मग पहा आरोग्य - बहार! - Marathi News | Holy basil-aloe vera- rose- helps for healthy habits and diet. | Latest sakhi News at Lokmat.com
>आहार -विहार > तुळस-कोरफड-गावठी गुलाब यांना तुमच्या घरातल्या कोपऱ्यात जागा द्या, मग पहा आरोग्य - बहार!

तुळस-कोरफड-गावठी गुलाब यांना तुमच्या घरातल्या कोपऱ्यात जागा द्या, मग पहा आरोग्य - बहार!

आपल्या आहार-घरगुती औषधात सहज उपयोगी पडेल अशी घरातल्याच हिरव्या कोपऱ्यातली सोपी जादू.   

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:25 PM2021-04-22T16:25:23+5:302021-04-22T16:32:28+5:30

आपल्या आहार-घरगुती औषधात सहज उपयोगी पडेल अशी घरातल्याच हिरव्या कोपऱ्यातली सोपी जादू.   

Holy basil-aloe vera- rose- helps for healthy habits and diet. | तुळस-कोरफड-गावठी गुलाब यांना तुमच्या घरातल्या कोपऱ्यात जागा द्या, मग पहा आरोग्य - बहार!

तुळस-कोरफड-गावठी गुलाब यांना तुमच्या घरातल्या कोपऱ्यात जागा द्या, मग पहा आरोग्य - बहार!

Next
Highlightsनियम एकाच कोणतेच रासायनिक खत अजिबात वापरायचे नाही.

-मंदार वैद्य

गावी सुट्टीला गेल्यावर उन्हा तान्हात हुंदडून, आंबट चिंबट खाऊन हमखास आजारी पडायला व्हायचं. दिवसभर शेतीच्या कामात आणि गायी गुरांची काळजी घेण्यात व्यस्त असलेल्या आजी आजोबांचे लक्ष आपल्या खोकाल्याकडे जाऊ नये अस कितीही वाटलं तरी पकडले जायचोच मग घरगुती औषध सुरु व्हायची. सहाणीवर उगाळलेल्या सुंठेचा लेप, तुरटी, हळद, आल्याचा रस, मध याचे चाटण आणि झोपताना कंपल्सरी हळद घातलेले दुध. असे अनेक उपचार. माझ्या आजोबांचे त्यांच्याच वयाचे एक मित्र आमच्याकडे आले की स्वतः सह सगळ्या मुलांना कडू लिंबाच्या काडीने दात घासायला लावायचे. आमच्या आजोबांनी लावलेला गावाठी गुलाब आता एखाद्या वृक्षासारखा झाला आहे. या गुलाबाची फुलं थोड्याशा साखरेसह काचेच्या बरणीत घालून आम्ही गुलकंद करायला ठेवायचो, पण तो गुलकंद मुरण्या आधीच आम्ही फस्त करायचो. आता त्या सुट्ट्यांच्या आठवणी शिल्लक आहेत. आता आपण घरातल्या छोट्या जागेतल्या हिरव्या कोपऱ्यात असे काही औषधी प्रयोग करु शकतो का?
१. हिरव्या कोप-यात औषधी वनस्पतींचा विचार करताना सर्व प्रथम तुळशीचे नाव पुढे येत. तुळस ही रोगनाशक शक्ती मानली जाते. विशेषतः सर्दी, खोकला, ताप या आजारांमध्ये तुळस प्रभावकारी औषध आहे. राम तुळस, कृष्ण तुळस, रान तुळस असे तुळशीचे अनेक प्रकार आहेत. राम तुळस गडद हिरव्या रंगाची असते तर कृष्ण तुळस काळपट असते. कृष्ण तुळसेचा सुगंध राम तुलासेपेक्षा जास्त उग्र असतो. रान तुळसेच्या पानांचा वास अति उग्र असतो. तिच्या मंजुळांचा आकारही मोठा असतो. तुळशीचे रोप आठ इंची कुंडीत आगदी सहज वाढते. फक्त कुंडीतील मातीत सातत्याने शेण काला, गोमुत्र, कुजलेला काडी कचरा टाकत राहावा. तुळशीच्या मंजुळा ओल्या असतानाच खुडून टाकव्यात. आणि हो पूजेच्या निर्माल्याचे पाणी, दुध, दही या सारखे पदार्थ कुंडीत अजिबात टाकू नयेत. रोज तुळशीचे किमान एक पान तरी खावे, त्या निमित्ताने कुंडीची देखभाल ही करावी.
तुळशीच्या बरोबरीनेच गावाती चहा आणि लांबट पानाचा पुदिनाही आठ इंची कुंड्यात लावावा. गावाती चहा, पुदिन्याची पाने आणि तुळशीची पाने एकत्रित रित्या उकळून छान उत्साहवर्धक पेय तयार होते. चहाची सवय कमी करण्यासाठी हे पेय म्हणजे उत्तम पर्यायच आहे.


२. हिरव्या कोप-याची शोभा वाढवणारी आणि तुलनेने अधिक कणखर वनस्पती म्हणजे कोरफड. हल्ली कोरफडीच्या वापरा बद्दल खूपच जाणीव निर्माण झाली आहे. आपल्या हिरव्या कोप-यात १२ इंची कुंडीमध्ये ही कोरफड छान वाढते. कोरफडीचा ताजा गर अंघोळी पूर्वी केसांना लावून ठेवण्याने केस निरोगी राहण्यास मदत मिळते. डॉक्टरांच्या सल्ल्याने कोरफडीचा रस घेतल्यास अपचनाच्या अनेक तक्रारी दूर होतात. कुंडीतील कोरफडीचे पान तोडताना सर्वात खालील पान धारदार सुरीने कापावे. कुंडीतील मातीचे सतत्याने पुनर्भरण करावे.
३. आणखी एक औषधी वनस्पती म्हणजे अडुळसा. गर्द हिरवी पाने आणि पांढ-या फुलांचे घोस असलेले अदुळशाचे झाड हिरव्या कोप-यात १२ इंची अगदी सहज पणे वाढते. खोकला बरा होण्यासाठी अडुळशाच्या पानांचा काढा किंवा रस उपयुक्त असतो. अडुळशाची स्वच्छ धुतलेल्या पानांचा मंद आचेवर उकळलेला काढा खोकल्या साठी उपयुक्त असतो.

४. आणखी जागा असेल तर गावठी गुलाब नक्की लावावा. काचेच्या बाटलीत गावठी गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या आणि सम प्रमाणत खाडी साखर टाकून उन्हात मुरायला ठेवल्यास महिनाभरात छान गुलकंद तयार होईल. गुलकंद एक उत्तम पाचक आहे तसेच उष्णतेपासून होणारे विकार यावर गुलकंदाचा चांगला उपयोग होतो. गावठी गुलाब लावताना मात्र किमान १६ इंची कुंडी वापरावी. कोणत्याही कुंडीतील माती सातत्यने हलवत राहून तिचे शेणखत, गोमुत्राने पुनर्भरण करावे. तसेच गुलाबाची यथा योग्य छाटणी करणेही आवश्यक असते. गावठी गुलाबावर पांढरा काळा मावा येतो. म्हणूनच नीम अर्क तसेच गोमुत्राची ही सातत्याने फवारणी करावी.
नियम एकाच कोणतेच रासायनिक खत अजिबात वापरायचे नाही.

 

(लेखक सेंद्रीय आणि शहरी शेती तज्ज्ञ आहेत.)

Web Title: Holy basil-aloe vera- rose- helps for healthy habits and diet.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

संबंधित बातम्या

घामामुळे केसांवर येणारा चिकट, तेलकटपणा 'कसा' घालवाल; लगेचच वापरून पाहा ८ ट्रिक्स - Marathi News | Hair care Tips : Tips to get rid from oily hairs in summers know by expert | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घामामुळे केसांवर येणारा चिकट, तेलकटपणा 'कसा' घालवाल; लगेचच वापरून पाहा ८ ट्रिक्स

Hair care Tips : चिकट केसांपासून सुटका मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. ...

उन्हाळ्यात घामाने छातीखाली खाज येतेय? या उपायांनी मिळेल आराम - Marathi News | Easy home remedies for rashes and etching under breast | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात घामाने छातीखाली खाज येतेय? या उपायांनी मिळेल आराम

Easy home remedies : अनेक घरांमध्ये जागा कमी असल्यानं अंग व्यवस्थित न सुकवता कपडे घातले जातात. त्यामुळे त्वचेचे आजार वाढू शकतात. ...

कंटाळा आलाय? अनेकदा ठरवूनही व्यायाम करणं शक्य होत नाही; या ट्रिक्सनं स्वतःला प्रेरणा द्या - Marathi News | How to Motivate yourself with this ways to do yoga or exercise | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कंटाळा आलाय? अनेकदा ठरवूनही व्यायाम करणं शक्य होत नाही; या ट्रिक्सनं स्वतःला प्रेरणा द्या

व्यायाम एखाद्यावेळी केला तरी त्यात सातत्य नसतं.  अशावेळी स्वतःला व्यायामाची सवय लावण्यासाठी  काही आयडीयाज तुम्हाला उपयोगी पडतील. ...

लहान मुलांसाठी जीवघेणी ठरतेय कोरोनाची दुसरी लाट; वेळीच जाणून घ्या बचावाचे योग्य उपाय - Marathi News | CoronaVirus : Precautions for corona second wave for kids | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लहान मुलांसाठी जीवघेणी ठरतेय कोरोनाची दुसरी लाट; वेळीच जाणून घ्या बचावाचे योग्य उपाय

Precautions for corona : सध्याच्या कोरोना लाटेत लहान मुलांचा कोरोनापासून बचाव करणं गरजेचं आहे. कारण कोरोना आधीपेक्षा जास्त धोकादायक असल्याचं दिसून येत आहे. ...

मास्कपासून सुटका मिळणार कधी? जाणून घ्या घरोघरच्या महिलांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर - Marathi News | coronavirus update if there is freedom from the mask then vaccination in the country has to be completed fast | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मास्कपासून सुटका मिळणार कधी? जाणून घ्या घरोघरच्या महिलांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर

 दुसरीकडे अमेरिकेत ज्या लोकांना लसी देण्यात आल्या आहेत. त्यांना मास्कशिवाय वावरण्यास परवानगी दिली आहे. अशा स्थितीत भारतात मास्कपासून कधी सुटका मिळणार असा प्रश्न सगळ्यांच्याच मनात आहे.   ...

ना शॅम्पू, ना महागड्या ट्रिटमेंट; या डाळींच्या सेवनानं मिळतील लांबसडक केस, फायदे वाचून व्हाल अवाक् - Marathi News | Moong dal hair care use moong dal in your daily diet and hair mask to grow your hair fast | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ना शॅम्पू, ना महागड्या ट्रिटमेंट; या डाळींच्या सेवनानं मिळतील लांबसडक केस, फायदे वाचून व्हाल अवाक्

मुगाच्या डाळीनं केसांच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.  कारण त्यात प्रोटिन्सह, एंटीऑक्सिडेंट्स, मॅग्नीशियम, कॉपर, पोटॅशियम, विटमिन-बी असते. त्यामुळे केसांना पोषण मिळते. ...