अनेकदा वजन कमी करण्याच्या नादात आपण खूप सारे पथ्य पाळतो पण यामुळे आपली क्रेव्हिंग काही थांबत नाही. योगा, डाएट आणि खाण्यापिण्याच्या अनेक सवयींमध्ये बदल होतात. इतकंच नाही तर बाहेरील खाद्यपदार्थांपासून आपण पूर्णपणे लांब राहण्याचा प्रयत्न करतो. पण मित्र-मैत्रिणी किंवा कुटुंबासोबत बाहेर गेल्यावर नेमकं काय खावं हा भला मोठा प्रश्न उभा राहतो. तळलेले वडे, समोसे किंवा चीजने भरलेला पिझ्झा पाहिल्यावर जिभेवर ताबा ठेवणं मात्र कठीण होते. पण स्ट्रीट फूड म्हणजे नेहमीच वजन वाढवणारे असते असे नाही. त्यात असे काही पदार्थ आहेत जे चवीला चटपटीत तर आहेतच पण पौष्टिक आणि कमी कॅलरीजचे देखील आहेत. (Guilt-free street food snacks for health conscious people)
जर आपण स्मार्ट चॉइस केली तर बाहेर गेल्यावर आपण डाएटचा आनंद घेऊ शकतो. डाएटचा अर्थ फक्त उपाशी राहणे किंवा बेचव खाणे असा नसून, शरीराला आवश्यक ते घटक योग्य प्रमाणात देणे असा आहे.(Nutritionist recommended street food list) प्रथिनांनी (Protein) युक्त आणि फायबर भरपूर असलेले स्ट्रीट फूड निवडल्यास तुमचे पोट बराच वेळ भरलेले राहते, ज्यामुळे तुम्ही अवांतर खाणे टाळता. आपण ७ स्ट्रीट फूडबद्दल जाणून घेणार आहोत, जे आपल्या वजनावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतील आणि आपण गिल्ट-फ्री (Guilt-free) आनंदाचा अनुभव देतील.
उन्हाळ्यात प्या कूल- स्पाईसी ड्रिंक, ट्राय करा चटपटीत कोकम मॉकटेल- १० मिनिटांत होणारी सोपी रेसिपी
1. भाजलेले चणे हे प्रथिनांचा उत्तम स्त्रोत आहेत. रस्त्यावर मिळणारे भाजलेले चणे किंवा त्यात कांदा, टोमॅटो आणि लिंबू घालून तयार केलेले चणा चाट हा उत्तम लो-कॅलरी नाश्ता आहे. यात फायबर जास्त असल्यामुळे पचन सुधारते.
2. उकडलेले शेंगदाणे आणि त्यात चिरलेली कोथिंबीर , मिरची आणि लिंबू घातल्यास शेंगदाणा चाट तयार होईल. शेंगदाण्यामध्ये निरोगी फॅट्स असतात, जे आपल्या हृदयासाठी चांगले मानले जातात.
3. कणसामध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आणि फायबर असतात. रस्त्यावरील कोळशावर भाजलेले कणीस, ज्याला फक्त लिंबू आणि मसाला लावला जातो, हे बटर किंवा चीज पॉपकॉर्नपेक्षा कितीतरी पटीने आरोग्यदायी आहे.
4. अनेकांना स्ट्रीट फूडमध्ये गरम काहीतरी खायची इच्छा असते, अशावेळी आपण मुगाच्या डाळीचे धिरडे खाऊ शकतो. यात भरपूर प्रथिने असतात आणि कमी तेलकट असल्यामुळे डाएट फ्रेंडली जेवण ठरु शकते.
5. आपल्याला चायनीज खाण्याची इच्छा असेल तर तळलेल्या पदार्थांऐवजी वाफवलेले व्हेजीटेबल मोमोज निवडा. फक्त हे खाताना मैद्याचे प्रमाण कमी असेल याची काळजी देखील घ्यायला हवी.
6. बाहेर गेल्यावर सगळ्यात चांगला पर्याय वाफवलेली इडली. यात फॅट्स कमी असतात. सांबारमध्ये भाज्यांचे प्रमाण जास्त असल्याने ते पौष्टिक ठरते. आपण यात ज्वारीच्या लाह्यांची इडली देखील खाऊ शकतो.
7. सगळ्यात चांगला आणि सुरक्षित पर्याय म्हणजे फ्रुट चाट. यात साखर न घालता फक्त मसाला घालून खाल्ल्यास शरीराला आवश्यक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मिळतात.
