lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > दिग्दर्शक बोनी कपूर यांचे बॉडी ट्रांसफॉर्मेशन चर्चेत; ५ गोष्टींनी पटकन घटवलं वजन-वेट लॉस सिक्रेट

दिग्दर्शक बोनी कपूर यांचे बॉडी ट्रांसफॉर्मेशन चर्चेत; ५ गोष्टींनी पटकन घटवलं वजन-वेट लॉस सिक्रेट

Boney Kapoor Weight Loss Fat Transformation : बोनी कपूर यांचे बॉडी ट्रांसफॉर्मेशन पासून लोक हे जाणून घेण्यास उत्सुक आहे की जास्त वयाचे लोक वजन कसे कमी करू शकतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 10:28 AM2024-04-01T10:28:15+5:302024-04-01T10:33:40+5:30

Boney Kapoor Weight Loss Fat Transformation : बोनी कपूर यांचे बॉडी ट्रांसफॉर्मेशन पासून लोक हे जाणून घेण्यास उत्सुक आहे की जास्त वयाचे लोक वजन कसे कमी करू शकतात.

Boney Kapoor Weight Loss Fat Transformation : Weight Loss Fat Transformation Of Film Producer Boney Kapoor | दिग्दर्शक बोनी कपूर यांचे बॉडी ट्रांसफॉर्मेशन चर्चेत; ५ गोष्टींनी पटकन घटवलं वजन-वेट लॉस सिक्रेट

दिग्दर्शक बोनी कपूर यांचे बॉडी ट्रांसफॉर्मेशन चर्चेत; ५ गोष्टींनी पटकन घटवलं वजन-वेट लॉस सिक्रेट

बॉलिवूड दिग्दर्शक बोनी कपूर (Producer Boney Kapoor) यांनी आपल्या ट्रांसफॉर्मेशनची खास झलक आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. बोनी  कपूर यांचा हा लूक पाहिल्यानंतर सोशल मीडियावर त्याचे वेगवेगळे फोटोज व्हायरल होत आहे. (Weight Loss Trasnformation)  या फोटोमध्ये त्यांची पत्नी  श्री देवी सुद्धा दिसत आहे. पहिल्या फोटोमध्ये बोनी कपूर लठ्ठ दिसून येत आहेत तर दुसऱ्या फोटोमध्ये बोनी कपूर बरेच  बारीक झालेले दिसत आहे.

वेट लॉस ट्रांसफॉर्मेशनचा फोटो शेअर करताना कोलाजचा फोटो शेअर केला आहे. बोनी कपूर यांनी पोस्टवर रिएक्ट करताना एक्टर संजय कपूर यांनी लिहिले की, वाह आणि  टाळी वाजवण्याची कमेंट दिली आहे. बोनी कपूर यांनी आपले फॅमिली फिजिशियन आणि न्युट्रिशनिस्ट यांच्या सांगण्यावरून हेल्दी पद्धतीने वजन कमी केले आहे.

बोनी कपूर यांचे बॉडी ट्रांसफॉर्मेशन पासून लोक हे जाणून घेण्यास उत्सुक आहे की जास्त वयाचे लोक वजन कसे कमी करू शकतात. वाढत्या वयात वजन कमी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी. या विषयावर आहारातज्ज्ञ पूजा सिंह यांनी अधिक माहिती दिली आहे. 

१) योगाने सुरूवात करा

तज्ज्ञ सांगतात की वाढत्या वयात वजन कमी करणं थोडं कठीण ठरू शकतं. कारण वयाच्या पन्नाशीनंतर मेटाबॉलिझ्म स्लो होतो. अशावेळी लोक जास्त धावपळ करू शकत नाहीत. अशावेळी योगा सुरू करून वजन होण्यास मदत होते. एक्सप्रर्ट्सच्या म्हणण्यानुसार लोकांनी सुरूवातीला ३० ते ४० मिनिटं योगा केला तर वजन कमी होण्यास मदत होईल.

केस गळणं वाढलंय? जावेद हबीब सांगतात किचनमधला १ पदार्थ वापरा; झुपकेदार-दाट होतील केस

२) खाण्यापिण्याकडे लक्ष द्या

डाएटवर फोकस करणं गरजेचं आहे खाण्यापिण्यातून योग्य प्रमाणात फायबर्स, कॅल्शियम, प्रोटीन्स मिळणं आवश्यक आहे. आपल्या आहारात  दही, पनीर, मोड आलेली कडधान्य यांचा समावेश करा. 

माधुरीचे पती डॉ.राम नेने फिट राहण्यासाठी काय खातात? नाश्ता, जेवणाचं साधं रूटीन-पाहा

३) वॉकिंगवर फोकस करा

जर तुमचं वजन  जास्त असेल तर वॉक करण्याकडे जास्त फोकस करा. पूजा सांगतात की जेव्हा तुम्ही ९ ते १० तास उपाशी असतात किंवा एकाच जागी बसून असता तेव्हा शरीरातील फॅट्स वाढतात. (Weight Loss Fat Transformation) अशावेळी लोकांना वॉकिंगवर फोकस करण्याची आवश्यकता असते. कामाच्यादरम्यान थोडा ब्रेक घेऊन वॉक करा. याशिवाय  फुटस्टेप काऊंट करण्याचा प्रयत्न करा. ज्यामुळे एक्स्ट्रा कॅलरीज बर्न होण्यास मदत होईल. 

४) साखरेचे योग्य प्रमाणात सेवन

साखर आणि साखरयुक्त पदार्थांचे कमी प्रमाणात सेवन करा. ज्यामुळे फॅट्स वेगाने वाढतात. हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते  वयाच्या पन्नाशीनंतर वजन कमी करण्याच्या विचारात असाल तर सगळ्यात आधी साखर सोडा. विषेशत: कुकीज, आईस्क्रीम, गोड दही, एडेड शुगरयुक्त बिस्कीट्सचा आहारात समावेश  करू नका. 

डाळ तांदूळ न वाटता करा मऊ-लुसलुशीत इडल्या; रवा-बेसनाच्या इडल्यांची सोपी, चवदार रेसिपी

५) प्रोटीन्सयुक्त पदार्थांचा जास्त समावेश

आहारात जास्तीत जास्त प्रोटीन्सयुक्त पदार्थांचा समावेश करा. आहारात लीन प्रोटीन्सयुक्त पदार्थांचा समावेश करा. जेणेकरून शरीरातील फॅट्स जास्त प्रमाणात बर्न होतील. 

Web Title: Boney Kapoor Weight Loss Fat Transformation : Weight Loss Fat Transformation Of Film Producer Boney Kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.