lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > वेटलॉससाठी प्रयत्न करताय? मग थंडीत ताजेताजे मुळे खायला विसरू नका, ५ फायदे

वेटलॉससाठी प्रयत्न करताय? मग थंडीत ताजेताजे मुळे खायला विसरू नका, ५ फायदे

Weight loss tips: मुळ्याचा वास अनेक जणांना आवडत नाही. त्यामुळे कच्चा मुळा (benefits of eating muli) किंवा मुळ्याचा एखादा पदार्थ पानात दिसला तरी अनेक जणं नाक मुरडतात.. पण हाच मुळा तुमचे वजन कंट्रोल करण्यासाठी तसेच आरोग्यासोबतच सौंदर्य वाढविण्यासाठी कसा फायद्याचा ठरतो, ते बघा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2022 07:24 PM2022-01-07T19:24:19+5:302022-01-07T19:25:25+5:30

Weight loss tips: मुळ्याचा वास अनेक जणांना आवडत नाही. त्यामुळे कच्चा मुळा (benefits of eating muli) किंवा मुळ्याचा एखादा पदार्थ पानात दिसला तरी अनेक जणं नाक मुरडतात.. पण हाच मुळा तुमचे वजन कंट्रोल करण्यासाठी तसेच आरोग्यासोबतच सौंदर्य वाढविण्यासाठी कसा फायद्याचा ठरतो, ते बघा...

Benefits of eating radish for weight loss, hair fall, dandruff and skin care | वेटलॉससाठी प्रयत्न करताय? मग थंडीत ताजेताजे मुळे खायला विसरू नका, ५ फायदे

वेटलॉससाठी प्रयत्न करताय? मग थंडीत ताजेताजे मुळे खायला विसरू नका, ५ फायदे

Highlightsहिवाळ्यात कोरड्या पडलेल्या त्वचेला मॉईश्चर करून हायड्रेटड ठेवण्याचे, त्वचा मऊ, मुलायम करण्याचे काम मुळा करतो.

गाजर, काकडी, बीट असं सॅलड दिलं तर ते आवडीनं खाणारे अनेक जणं आहेत. पण हे प्रेम काही मुळ्याच्या वाट्याला येत नाही. मुळा पानात दिसल्या दिसल्या अनेक जणांना तो नकोसा असतो. अर्थात मुळा चवीने आणि वासानेही थोडा उग्रच असतो. पण म्हणून मुळा खायचाच नाही किंवा त्याच्यावर अगदीच बहिष्कार टाकायचा, असं करू नका.. हिवाळ्यात (winter food) मिळणारा मुळा फार फार तर वर्षातून केवळ २ महिने आपल्या वाट्याला येत असतो. त्या दोन महिन्यात त्याचा लाभ घ्यायला विसरू नका. विशेष म्हणजे जे लोक वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, ज्यांना त्वचेच्या आणि केसांच्या समस्या आहेत, त्यांनी तर हिवाळ्यात मुळा (Benefits of eating radish) खायलाच पाहिजे...

 

मुळा खाण्याचे फायदे
१. वेटलॉससाठी उपयुक्त (helps for weight loss)

मुळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर असतात. त्यामुळे मुळा वजन नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करतो. मुळ्याच्या सेवनामुळे शरीरातील चयापचय क्रिया सुधारते. यामुळे खाल्लेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन होते आणि त्यामुळे मग शरीरात चरबी साचून राहण्याचे प्रमाण एकदम कमी होते. शिवाय मुळा खाल्ल्यामुळे बराच वेळ भुक लागत नाही. त्यामुळे सारखे सारखे खाल्ले जात नाही. त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचे आहे, त्यांनी कच्चा मुळा किंवा मुळ्याचे विविध पदार्थ अवश्य खावेत.

 

२. त्वचेचे आरोग्य सुधारते (for healthy skin)
मुळा हा आरोग्यासाठी जसा चांगला आहे, तसाच तो त्वचेसाठीही उत्तम आहे. मुळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणात ॲण्टी ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असते. त्यामुळे त्वचेचे उत्तम प्रमारे पोषण करण्याचे गुण मुळ्यामध्ये आहेत. चेहऱ्यावर वारंवार पिंपल्स येत असतील, त्वचा रुक्ष आणि कोरडी झाली असेल, तर मुळा खाण्याचे प्रमाण वाढवावे. मुळा खाल्ल्यामुळे चेहऱ्यावरचे वांगाचे डागही कमी होण्यास मदत होते.

 

३. केसातील कोंड्यावर उपयुक्त (best remedy for dandruff)
हिवाळ्याच्या दिवसात डोक्याची त्वचाही कोरडी पडते. यामुळे मग डोक्यात खाज येते आणि कोंडा खूप जास्त प्रमाणात वाढतो. हिवाळ्यातली ही कोंड्याची समस्या सोडवायची असेल तर मुळा हा त्यावरचा उत्तम उपाय आहे. मुळ्याचा रस केसांच्या मुळाशी लावा. अर्धा ते एक तास तो तसाच राहू द्या आणि त्यानंतर केस नेहमीप्रमाणे धुवून टाका. हा उपाय केल्याने कोंड्याचा त्रास लक्षणीय प्रमाणात कमी होतो.

 

४. नॅचरल मॉईश्चरायझर.. (natural moisturiser)
हिवाळ्यात कोरड्या पडलेल्या त्वचेला मॉईश्चर करून हायड्रेटड ठेवण्याचे, त्वचा मऊ, मुलायम करण्याचे काम मुळा करतो. त्यामुळे मुळ्याला नॅचरल मॉईश्चरायझिंग एजंट म्हणून ओळखले जाते. शरीर आतून नैसर्गिक पद्धतीने डिटॉक्स करण्यासाठीही मुळ्याचा उपयोग होतो. मुळ्यामध्ये व्हिटॅमिन्स देखील भरपूर प्रमाणात असतात.  

 

Web Title: Benefits of eating radish for weight loss, hair fall, dandruff and skin care

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.