Lokmat Sakhi >Social Viral > रस्त्यावर फळं विकता विकता मुलांचा अभ्यास घेणारी 'माऊली'; व्हिडिओ व्हायरल, अशी जिद्द पाहिजे..

रस्त्यावर फळं विकता विकता मुलांचा अभ्यास घेणारी 'माऊली'; व्हिडिओ व्हायरल, अशी जिद्द पाहिजे..

Women fruit seller teaches her kids while selling fruits : रस्त्यावर फळं विकणाऱ्या माऊलीची फोटो व्हिडिओ पाहून  सोशल मीडिया युजर्स भावूक झाले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 03:58 PM2023-08-30T15:58:28+5:302023-08-30T16:38:00+5:30

Women fruit seller teaches her kids while selling fruits : रस्त्यावर फळं विकणाऱ्या माऊलीची फोटो व्हिडिओ पाहून  सोशल मीडिया युजर्स भावूक झाले आहेत.

Women fruit seller teaches her kids while selling fruits near roadside stall video goes viral | रस्त्यावर फळं विकता विकता मुलांचा अभ्यास घेणारी 'माऊली'; व्हिडिओ व्हायरल, अशी जिद्द पाहिजे..

रस्त्यावर फळं विकता विकता मुलांचा अभ्यास घेणारी 'माऊली'; व्हिडिओ व्हायरल, अशी जिद्द पाहिजे..

सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. कधी असे व्हिडिओज व्हायरल होतात जे पाहून मन भावूक होते.  रस्त्यावर फळं विकणाऱ्या माऊलीची फोटो व्हिडिओ पाहून  सोशल मीडिया युजर्स भावूक झाले आहेत. आई कधीच आपल्या कर्तव्यांपासून मागे हटत नाही ती नेहमी आपल्या मुलांची काळजी घेते आणि  त्यांच्या शिक्षणासाठी आपल्याकडून होईल तितके कष्ट नेहमी करते. (Women fruit seller teaches her kids while selling fruits near roadside stall video goes viral) आईच्या  त्यागाचे उदाहरण देणारा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

सोशल मीडिया युजर @dc_sanjay_jas ने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात तुम्ही पाहू शकता एक महिला रस्त्याच्या किनारी फळं  विकत आहे  तिची दोन लहान मुलं खाली प्लास्टीकचा  कागद घालून अभ्यास करत बसलेली असतात.  या मुलांजवळ पुस्तकं, पेन्सिल आणि एक शाळेची बॅग असल्याचं दिसून येतंय. फळं विकत असतानाच ती महिला आपल्या मुलांजवळ येते आणि त्यांच्या अभ्यास घेते.

यावेळी तिने आपल्या लहान मुलाला मांडीवर बसवलं आहे.  'आज माझ्याकडे कॅप्शनला काही शब्द नाहीत,' असं या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. 29 ऑगस्ट 2023 रोजी पोस्ट केल्यापासून, पोस्टने आधीच १ लाखापेक्षा जास्त व्हिव्हज मिळाले आहेत.  लोकांनी या महिलेच्या प्रयत्नांना सलाम केला आहे. या व्हिडिओवर कमेंट्स करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 
 

Web Title: Women fruit seller teaches her kids while selling fruits near roadside stall video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.