काकडीच्या सालींचे 'हे' उपयोग पाहाल तर कधीच ते कचऱ्यात नाही फेकणार- बघा कसे वापरायचे

Published:June 18, 2024 09:18 AM2024-06-18T09:18:22+5:302024-06-18T09:20:01+5:30

काकडीच्या सालींचे 'हे' उपयोग पाहाल तर कधीच ते कचऱ्यात नाही फेकणार- बघा कसे वापरायचे

आपल्या स्वयंपाक घरात नेहमीच लागणारा पदार्थ म्हणजे काकडी. कोशिंबीर करायला किंवा नुसती खायलाही काकडी छान लागते.

काकडीच्या सालींचे 'हे' उपयोग पाहाल तर कधीच ते कचऱ्यात नाही फेकणार- बघा कसे वापरायचे

बहुसंख्य घरांमध्ये काकडीची सालं काढली जातात आणि नंतर ती सलाडमध्ये, कोशिंबीरीमध्ये वापरली जाते. ही सालं आपण सरळ उचलून कचऱ्यात टाकून देतो. पण त्याचेही खूप छान उपयोग करता येतात. बघा कसा करायचा काकडीच्या सालींचा उपयोग..

काकडीच्या सालींचे 'हे' उपयोग पाहाल तर कधीच ते कचऱ्यात नाही फेकणार- बघा कसे वापरायचे

काकडीची सालं स्वच्छ धुवून घ्या. मिक्सरमधून फिरवून त्याची बारीक पेस्ट करा. यामध्ये थोडं फ्रिजमधलं थंडगार पाणी टाका. थोडं लिंबू पिळा, किंचित मीठ टाका. सरबत म्हणून प्यायला ते खूप छान लागतं.

काकडीच्या सालींचे 'हे' उपयोग पाहाल तर कधीच ते कचऱ्यात नाही फेकणार- बघा कसे वापरायचे

काकडीची सालं मिक्सरमधून फिरवून त्याची बारीक पेस्ट करून घ्या. या पेस्टमध्ये साखर, मध, बेसन असे वेगवेगळे पदार्थ टाकून तुम्ही त्याचे वेगवेगळे फेसपॅक करू शकता. त्वचेसाठी काकडीचा रस अतिशय उपयुक्त ठरतो.

काकडीच्या सालींचे 'हे' उपयोग पाहाल तर कधीच ते कचऱ्यात नाही फेकणार- बघा कसे वापरायचे

गार्डनिंगसाठीही काकडीच्या सालींचा खूप छान वापर करता येतो. काकडीच्या साली मिक्सरमधून फिरवून साध्या पाण्यात मिक्स करा. आणि ते पाणी झाडांना द्या. काकडीच्या सालींमध्ये मिनरल्स, व्हिटॅमिन्स भरपूर असल्याने झाडांच्या वाढीसाठी त्यांचा चांगला फायदा होतो. झाडांवर किड, रोग पडू नये म्हणूनही त्याचा फायदा होतो.

काकडीच्या सालींचे 'हे' उपयोग पाहाल तर कधीच ते कचऱ्यात नाही फेकणार- बघा कसे वापरायचे

वरण किंवा आमटी करताना त्यात काकडीची सालं टाकून ठेवा. आमटी पुर्ण उकळून झाली की मग ती सालं बाहेर काढा. वरणाला, आमटीला काकडीचा छान फ्लेवर येईल.

काकडीच्या सालींचे 'हे' उपयोग पाहाल तर कधीच ते कचऱ्यात नाही फेकणार- बघा कसे वापरायचे

डस्टबीनच्या तळाशी काकडीची सालं टाकून ठेवा. त्यावर कचऱ्याची बॅग लावा. यामुळे डस्टबिनमध्ये कुबट, घाण वास येणार नाही.