Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > काय तरी विचित्र..कहरच! माऊथ कंडोम ट्रेंड, वजन कमी करण्यासाठी नवा प्रकार - बावळटपणा इतका की..

काय तरी विचित्र..कहरच! माऊथ कंडोम ट्रेंड, वजन कमी करण्यासाठी नवा प्रकार - बावळटपणा इतका की..

Mouth Condom Trend For Weight Loss : हेल्थ एक्सपर्ट हा दावा पूर्णपणे खोडून काढत आहेत. ते सांगतात की, हा ट्रेंड आरोग्यासंबंधी एक मोठी समस्या ठरू शकतो. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 16:55 IST2026-02-26T13:55:59+5:302026-02-26T16:55:12+5:30

Mouth Condom Trend For Weight Loss : हेल्थ एक्सपर्ट हा दावा पूर्णपणे खोडून काढत आहेत. ते सांगतात की, हा ट्रेंड आरोग्यासंबंधी एक मोठी समस्या ठरू शकतो. 

Weird and Very Dangerous Weight Loss Trend, People Using Cling Film as Mouth Condoms for Food | काय तरी विचित्र..कहरच! माऊथ कंडोम ट्रेंड, वजन कमी करण्यासाठी नवा प्रकार - बावळटपणा इतका की..

काय तरी विचित्र..कहरच! माऊथ कंडोम ट्रेंड, वजन कमी करण्यासाठी नवा प्रकार - बावळटपणा इतका की..

Mouth Condom Trend For Weight Loss : वजन कमी करणं किंवा स्लीम दिसणं हा फारच मोठा चिंतेचा विषय बनला आहे. लोक वजन कमी करण्यासाठी काय करत याचा काहीच नेम नाही. याचं भयावह सत्य सांगणारं उदाहरण अलिकडेच समोर आलं आहे. चीनच्या सोशल मीडियावर हल्ली फारच विचित्र आणि खतरनाक 'ईटिंग हॅक' व्हायरल होत आहे, ज्याला ‘माउथ कंडोम’ (Mouth Condom) अस म्हणतात. या ट्रेंडमध्ये तरूण - तरूणी आपल्या तोंडावर आणि ओठांवर क्लींग फिल्म किंवा प्लास्टिक रॅप टेप लावतात आणि त्यावरून अन्न खात असल्याचं नाटक करतात. या विचित्रपणाला असा तर्क दिला जात आहे की, ते जेवणाच्या टेस्टचा आनंद तर घेऊ शतात, पण एकही कॅलरी त्यांच्या शरीरात जाणार नाही. 

लोक अन्न जोरजोरात चावतात आणि मग ते बाहेर काढून फेकतात. त्यांचा दावा आहे की, असं केल्याने मेंदूला असा भ्रम होतो की, शरीराला पोषण मिळत आहे, ज्यामुळे भूक शांत होते. पण हेल्थ एक्सपर्ट हा दावा पूर्णपणे खोडून काढत आहेत. ते सांगतात की, हा ट्रेंड आरोग्यासंबंधी एक मोठी समस्या ठरू शकतो. 

एक्सपर्ट सांगतात की, ही वजन कमी करण्याची एक पद्धत नाही तर एक गंभीर 'ईटिंग डिसऑर्डर'चा धोका वाढवणारी पद्धत आहे. जेव्हा आपण अन्न थुंकतो, तेव्हा शरीराला ताकद मिळत नाही. ज्यामुळे काहीतरी खाण्याची लालसा आणखी जास्त वाढते. याने मेंदूला असा संकेत मिळतो की, त्याला विना कॅलरी टेस्ट आणि नाटक करून आनंद मिळतो. ही बाब मानसिक आरोग्यासाठी घातक ठरू शकते. 

एक्सपर्ट पुढे सांगतात की, या 'माउथ कंडोम' ट्रेंडचा धोका कमी नाहीये. प्लास्टिक रॅप सतत दातांनी चावल्याने मोठ्या प्रमाणात मायक्रोप्लास्टिक शरीराच्या शरीराच्या आत जाण्याचा धोका असतो. चावून खाताना प्लास्टिकचे सूक्ष्म कण लाळेसोबत मिक्स होतात आणि नकळत श्वसन किंवा पचन तंत्रात पोहोचू शकतात. ज्यामुळे कॅन्सर आणि हार्मोनल असंतुलन यासारखी गंभीर समस्या होऊ शकते. 

भलेही प्लास्टिक रॅपसोबत अन्न खाणं एका छोट्या प्रयोगाच्या रूपात सुरू झालं असेल, पण हा ट्रेंड लाखो व्ह्यूज मिळवणारा एक मोठा ट्रेंड बनला आहे. सोशल मीडियावर यावरून मोठा वाद पेटला आहे. काही लोक याला कॅलरी कंट्रोल करण्याचा एक स्मार्ट उपाय मानत आहेत. तर काही लोक याला जीवघेणा खेळ मानत आहेत. याआधीही जबडे लॉक करणारे डिव्हाइस आणि ऑनलाईन विकले जाणारे फॅट-डिजॉल्विंग इंजेक्शन यांसारख्या ट्रेंड्सनी सुद्धा जगाला हैराण केलं आहे.

Web Title : विचित्र 'माउथ कंडोम' ट्रेंड: युवाओं का खतरनाक वजन घटाने का तरीका

Web Summary : एक खतरनाक 'माउथ कंडोम' ट्रेंड ऑनलाइन चल रहा है, जहाँ लोग अपने मुँह पर प्लास्टिक रैप के साथ भोजन खाते हैं, फिर उसे थूक देते हैं। विशेषज्ञों का चेतावनी है कि इससे खाने के विकार, माइक्रोप्लास्टिक का अंतर्ग्रहण और कैंसर और हार्मोनल असंतुलन जैसी गंभीर स्वास्थ्य समस्याएं हो सकती हैं।

Web Title : Bizarre 'Mouth Condom' Trend: Youth's Dangerous Weight Loss Fad

Web Summary : A dangerous 'Mouth Condom' trend is circulating online where people eat food with plastic wrap on their mouth, then spit it out. Experts warn this can lead to eating disorders, microplastic ingestion, and serious health problems like cancer and hormonal imbalances.