lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > 'वो स्त्री है...! केकमध्ये भरलं रगडा-गोड चटणी, कडेने लावली शेव..पाणीपुरी केकचा व्हिडिओ व्हायरल..

'वो स्त्री है...! केकमध्ये भरलं रगडा-गोड चटणी, कडेने लावली शेव..पाणीपुरी केकचा व्हिडिओ व्हायरल..

Vlogger Makes Pani Puri Cake, Internet Calls It, "Horrible" : पाणीपुरी केक कापताना नवऱ्याचे हात थरथरले कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2024 04:45 PM2024-01-25T16:45:46+5:302024-01-25T16:46:41+5:30

Vlogger Makes Pani Puri Cake, Internet Calls It, "Horrible" : पाणीपुरी केक कापताना नवऱ्याचे हात थरथरले कारण..

Vlogger Makes Pani Puri Cake, Internet Calls It, "Horrible" | 'वो स्त्री है...! केकमध्ये भरलं रगडा-गोड चटणी, कडेने लावली शेव..पाणीपुरी केकचा व्हिडिओ व्हायरल..

'वो स्त्री है...! केकमध्ये भरलं रगडा-गोड चटणी, कडेने लावली शेव..पाणीपुरी केकचा व्हिडिओ व्हायरल..

लॉकडाऊनमध्ये बऱ्याच जणांनी केक बनवण्याचे प्रशिक्षण घेतले होते. या काळात अनेकांनी क्लासेस किंवा व्यवसाय देखील सुरु केला होता. आउट ऑफ बॉक्स विचार करून गृहिणी केक तयार करत होते. चॉकलेट केकपासून फ्रूट केकपर्यंत विविध फ्लेवर्सचे केक बनवायला शिकले. पण एका अतिउत्साही महिलेने अशा एका केकचा शोध लावला, की जे पाहून नेटकरी संतप्त झाले आहेत (PaniPuri Cake).

नेटकरी सोडा, हा केक कापताना महिलेच्या नवऱ्याचा हात देखील थरथर कापत होता (Viral Video). पार चक्रावून टाकणारा केक महिलेने नेमका कसा बनवला? त्या केकमध्ये नक्की आहे तरी काय? बघा(Vlogger Makes Pani Puri Cake, Internet Calls It, "Horrible").

ना धड केक ना धड पाणीपुरी

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये केकची जोरदार चर्चा होत आहे. कारण हा केक चक्क पाणीपुरीचा बनवण्यात आला आहे. महिलेने केक तयार करताना आधी ब्रेडचा बेस ठेवला, त्यावर ब्रशने हिरवी चटणी लावली, मग वाटण्याचा रगडा पसरवून घातला. त्यावर गोड चटणी आणि शेव भुरभुरून दुसरा ब्रेडचा बेस ठेवला. असं करत तिने केकचे लेअर्स पूर्ण केले, आणि कडेने केकची क्रीम लावून कव्हर केला.

प्रजासत्ताक दिन विशेष: बांगडीने काढा ३ सुबक सुंदर रांगोळ्या- १० मिनिटांत करा सुंदर सजावट

मुख्य म्हणजे क्रीम लावल्यानंतर महिलेने कडेला शेव लावून केकला सजवले. तयार केक पाहून नेटकऱ्यांनी व्हिडिओला प्रचंड ट्रोल केलं आहे. कारण या रेसिपीतून ना धड केक तयार झाला ना धड पाणी पुरी. त्यामुळे खवय्ये प्रचंड संतापले आहेत.

नेटकऱ्यांनी घेतली फिरकी

व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरी संतप्त झाले. कारण पाणीपुरीचा चाहतावर्ग मोठा आहे, आणि या महिलेने केक आणि पाणीपुरीचा फ्युजन तयार करून रेसिपीचा सत्यानाश केला आहे. विशेष म्हणजे व्हिडिओच्या शेवटी केक कापताना महिलेच्या नवऱ्याचे हात देखील थरथर कापत होता.

लेकीची माया आभाळाएवढी! लाडक्या लेकींसाठी आईबाबांची खास पोस्ट, नेते-अभिनेतेही झाले इमोशनल

व्हिडिओवर मजेशीर कमेण्ट करत एकाने लिहिले की, 'या रेसिपीसाठी गरूड पुराणात वेगळी शिक्षा आहे',  तर दुसऱ्याने, 'यात नवीन काही नाही. जेलमध्ये कैद्यांना थर्ड डिग्री टॉर्चर म्हणून हा केक खायला देतात'. सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत असून, नेटिझन्सने चांगलंच ट्रोल केलं आहे.

Web Title: Vlogger Makes Pani Puri Cake, Internet Calls It, "Horrible"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.